भरधाव ट्रॅक्टरची दोघींना धडक
By admin | Updated: January 23, 2015 01:03 IST
महिला ठार : चिमुकली गंभीर : पारडीत तणाव
भरधाव ट्रॅक्टरची दोघींना धडक
महिला ठार : चिमुकली गंभीर : पारडीत तणावनागपूर : भरधाव ट्रॅक्टरने अंगणात बसलेल्या चिमुकलीसह दोघींना धडक दिली. यामुळे महिला ठार झाली तर चिमुकली गंभीर जखमी झाली. आजूबाजूच्या महिलांनी प्रसंगावधान राखत पळ काढल्याने त्या बचावल्या. पारडी (कळमना) सदगुरुनगरात (भांडेवाडी) आज सकाळी ११.३० वाजता हा थरारक अपघात घडला. वैशाली सुभाष सहारे (वय ३५) ही महिला अन्य काही महिलांसह गप्पा करीत अंगणात बसली होती. आरोपी सचिन सोमाजी गणवीर (वय ३५) हा निष्काळजीपणे ट्रॅक्टर चालवत होता. भरधाव ट्रॅक्टर अनियंत्रित झाल्याने सहारेच्या अंगणात शिरला. त्यामुळे वैशाली तसेच तिच्या बाजूला खेळणारी खुशबू श्रीराम कटरे (वय ४ वर्षे) या दोघी गंभीर जखमी झाल्या. आजूबाजूच्या महिलांनी भरधाव ट्रॅक्टर येत असल्याचे पाहून पळ काढल्याने त्या बचावल्या. या अपघातामुळे घटनास्थळी प्रचंड तणाव निर्माण झाला. जखमींना डॉक्टरकडे नेले असता डॉक्टरांनी वैशाली सहारे यांना मृत घोषित केले. खुशबूची प्रकृती गंभीर असून, तिला धंतोलीतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. नलिनी महादेवराव लांजेवार यांच्या तक्रारीवरून कळमना पोलिसांनी आरोपी सचिन गणवीर याच्याविरुद्ध गुन्हे दाखल केले. ----