रिक्षा चालकाकडून घटस्फोटित महिलेवर अत्याचार धक्कादायक : एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
By admin | Updated: August 24, 2016 23:16 IST
जळगाव : शासकीय योजनेचा लाभ मिळवून देण्यासह लग्नाचे आमिष दाखवून एका ३५ वर्षीय घटस्फोटित महिलेवर अत्याचार केल्याचा प्रकार उजेडात आला आहे. याप्रकरणी बुधवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात पीडितेच्या फिर्यादीवरून रिक्षा चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रिक्षा चालकाकडून घटस्फोटित महिलेवर अत्याचार धक्कादायक : एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
जळगाव : शासकीय योजनेचा लाभ मिळवून देण्यासह लग्नाचे आमिष दाखवून एका ३५ वर्षीय घटस्फोटित महिलेवर अत्याचार केल्याचा प्रकार उजेडात आला आहे. याप्रकरणी बुधवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात पीडितेच्या फिर्यादीवरून रिक्षा चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला ही सुप्रीम कॉलनीतील नितीन साहित्यानगरमध्ये राहते. तिचा घटस्फोट झाला असून धुणी-भांडी करून ती उपजीविका भागवते. दरम्यानच्या काळात तिची रिक्षा चालक असलेला संशयित आरोपी सद्दाम शहा जाकीर शहा (रा.मेहरूण) याच्याशी ओळख झाली. सद्दामने पीडितेशी जवळीक वाढवून लग्नाचे आमिष दाखवले. तसेच शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याचा बहाणा करत तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केले, असे फिर्यादित नमूद करण्यात आले आहे. या फिर्यादीवरून संशयित सद्दामविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.