बक्षीस वितरण समारंभ (सीएनएक्स)
By admin | Updated: August 19, 2015 22:27 IST
व्ही. जी. शिवदारे कॉलेज ऑफ फार्मसी यांच्यावतीने कै. वि. गु. शिवदारे यांच्या ८९ व्या जयंतीनिमित्त महाविद्यालयात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. बक्षीसप्राप्त विद्यार्थ्यांना डॉ. श्रीकांत येळेगावकर यांच्या हस्ते स्मृतीचिन्हे व प्रमाणपत्रे वाटण्यात आली. वक्तृत्व, निबंध, रांगोळी, सामान्य ज्ञान, देशभक्तीपर गीत गायन स्पर्धेचे आयोजन केले होते. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. पी. टी. सावंत यांनी केले. फार्मसीचे प्राचार्य गोखले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यादीवाचन प्रा. एस. ए. पाटील व प्रा. एम. बी. पाटील यांनी केले. परिचय प्रा. एम. बी. कांबळे यांनी करुन दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. शुभदा शिवपुजे यांनी तर आभार कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य एम. एस. कलशेी यांनी मानले. कार्यक्रमास विश्वस्त डॉ. राजशेखर हिरेमठ हे उपस्थित होते. कार्यक्रमासाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मच
बक्षीस वितरण समारंभ (सीएनएक्स)
व्ही. जी. शिवदारे कॉलेज ऑफ फार्मसी यांच्यावतीने कै. वि. गु. शिवदारे यांच्या ८९ व्या जयंतीनिमित्त महाविद्यालयात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. बक्षीसप्राप्त विद्यार्थ्यांना डॉ. श्रीकांत येळेगावकर यांच्या हस्ते स्मृतीचिन्हे व प्रमाणपत्रे वाटण्यात आली. वक्तृत्व, निबंध, रांगोळी, सामान्य ज्ञान, देशभक्तीपर गीत गायन स्पर्धेचे आयोजन केले होते. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. पी. टी. सावंत यांनी केले. फार्मसीचे प्राचार्य गोखले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यादीवाचन प्रा. एस. ए. पाटील व प्रा. एम. बी. पाटील यांनी केले. परिचय प्रा. एम. बी. कांबळे यांनी करुन दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. शुभदा शिवपुजे यांनी तर आभार कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य एम. एस. कलशेी यांनी मानले. कार्यक्रमास विश्वस्त डॉ. राजशेखर हिरेमठ हे उपस्थित होते. कार्यक्रमासाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.