शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

‘हिंदुत्व’ शब्दाचा घेणार फेरआढावा

By admin | Updated: October 17, 2016 04:13 IST

हिंदूंची जीवनशैली ध्वनित होते या राजकीयदृष्ट्या अत्यंत कळीच्या आणि नाजूक प्रश्नाचा सर्वोच्च न्यायालय सुमारे २० वर्षांनी फेरआढावा घेणार आहे.

नवी दिल्ली : ‘हिंदुत्व’ हा शब्द हिंदू धर्माचा निदर्शक आहे की तो संस्कृतीदर्शक शब्द असून त्यातून हिंदूंची जीवनशैली ध्वनित होते या राजकीयदृष्ट्या अत्यंत कळीच्या आणि नाजूक प्रश्नाचा सर्वोच्च न्यायालय सुमारे २० वर्षांनी फेरआढावा घेणार आहे.महाराष्ट्रात शिवसेनेने राजकारणासाठी हिंदुत्वाची कांस सर्वप्रथम धरली. १९८०च्या दशकाच्या मध्यात नव्या रूपाने स्थापन झालेल्या भारतीय जनता पार्टीने हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेनेशी युती केली आणि याचा लाभ घेत ही युती १९९५ मध्ये राज्यात सत्तेवर आली. भाजपानेही या हिंदुत्ववादी राजकारणाचा पुरेपूर लाभ करून घेत ‘विपक्ष’ ते ‘विकल्प’ अशी राष्ट्रीय पातळीवर मजल मारली.न्यायालयाच्या पातळीवर हिंदुत्वाची पहिली तपासणी विलेपार्ले विधानसभा पोटनिवडणुकीतील शिवसेनेच्या डॉ. रमेश प्रभू यांच्या निवडीच्या निमित्ताने झाली. काँग्रेसचे प्रभाकर कुंटे यांनी केलेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने प्रभूंची निवडणूक हिंदुत्वाच्या नावावर मते मागितल्याच्या कारणावरून रद्द केली. त्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मतदार म्हणून सहा वर्षे अपात्र ठरविले गेले. पुढे मनोहर जोशी यांच्या लोकसभा निवडणुकीलाही याच मुद्द्यावर यशस्वी आव्हान दिले गेले. प्रभू, ठाकरे व जोशी यांच्या अपिलांच्या निमित्ताने १९९५ मध्ये हा विषय सर्वोच्च न्यायालयात गेला तेव्हा तत्कालिन सरन्यायाधीश न्या. जे. एस. वर्मा यांच्या नेतृत्वाखालील तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने असा निकाल दिला की, हिंदुत्व हा शब्द हिंदू धर्म किंवा हिंदू धर्मावलंबी यांच्याच संदर्भात वापरला जातो, असे नाही. भारतीय संस्कृती आणि येथील लोकांची जीवनशैली यांच्यासाठीही हा शब्द वापरला जाऊ शकतो. त्यामुळे निवडणुकीच्या प्रचारी भाषणांमध्ये हिंदुत्वाची भाषा वापरली गेली म्हणून हिंदू धर्माच्या नावाने मते मागितली अथवा हिंदू उमेदवारासाठी मते मागितली असाच अर्थ काढता येणार नाही. भाषणाच्या संदर्भानुसार या शब्दांचा अर्थ घ्यायला हवा.ज्येष्ठ विधिज्ञ राम जेठमलानी यांनी केलेला युक्तिवाद मान्य करून न्यायालयाने त्यावेळी हा निकाल दिला होता. त्यानंतर हिंदुत्वावरून भारतीय राजकारण आमुलाग्र ढवळून निघाले. भाजपाने आपल्यावर होणारी सांप्रदायिकतेची टीका खोडून काढण्यासाठी आपल्या निवडणूक जाहिरनाम्यांमध्येही न्यायालयाच्या या निकालाचे हवाले दिले.आता सर्वोच्च न्यायालय त्यांच्यापुढे आलेल्या ताज्या प्रकरणांच्या अनुषंगाने २० वर्षांपूर्वीच्या आपल्या या निकालांचा फेरआढावा घेणार आहे. विद्यमान सरन्यायाधीश न्या. तीर्थ सिंग ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील सात न्यायाधीशांचे पूर्णपीठ मंगळवार १८ आॅक्टोबरपासून या विषयी सुनावणी करेल. स्वत: न्या. ठाकूर जानेवारीत निवृत्त होत असल्याने ‘हिंदुत्वा’ची न्यायालयाने आधी केलेली व्याख्या टिकते की बदलते याचा निकालही त्याआधी होईल. मूळ निकालाप्रमाणेच हा नवा निकालही देशाच्या राजकारणाच्या दृष्टिने तेवढाच महत्वाचा ठरेल, यात शंका नाही. (लोकमत न्यूज नेटवर्क)