शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

"माझी दया याचिका परत करा"; निर्भया प्रकरणातल्या दोषीची राष्ट्रपतींकडे विनंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2019 17:26 IST

निर्भया प्रकरणातला दोषी विनय शर्मा यानं शनिवारी राष्ट्रपतींना एक याचिका पाठवली.

नवी दिल्लीः निर्भया प्रकरणातला दोषी विनय शर्मा यानं शनिवारी राष्ट्रपतींना एक याचिका पाठवली. त्या याचिकेच्या माध्यमातून त्यानं गृहमंत्रालयाकडून करण्यात आलेली दया याचिका मागे घेण्याची विनंती केली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयानं जी याचिका राष्ट्रपतींना पाठवली आहे, त्यात स्वाक्षरी नसून ती अधिकृत नाही, त्यामुळे राष्ट्रपतींनी ती परत पाठवावी. केंद्रीय गृहमंत्रालयानं निर्भया प्रकरणातला दोषी विनय शर्माची दया याचिका रद्द करण्याची शिफारस केलेली आहे. गृहमंत्रालयानं दया याचिकेची अंतिम फाइल निर्णयासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे पाठवली आहे.दोन दिवसांपूर्वीच दिल्लीतले उपराज्यपाल अनिल बैजल यांनी गृहमंत्रालयाचा एक रिपोर्ट पाठवला होता. ज्यात सांगण्यात आलं होतं की, दोषीला कोणत्याही परिस्थिती शिक्षा माफ करता येणार नाही. दिल्ली सरकारनंही विनयची याचिका फेटाळून लावली होती. 2012मध्ये वैद्यकीय विद्यार्थिनीबरोबर दुष्कर्म आणि हत्या प्रकरणात दोषींपैकी विनयची शिक्षा माफ करण्याचा अर्ज करण्यात आला होता. आता याचिका फेटाळल्यानं विनयची फाशी निश्चित मानली जात आहे. 2012मध्ये घडलेल्या घटनेनं अख्खा देश हादरला होता. 23 वर्षीय युवतीवर दिल्लीमध्ये 16 डिसेंबर 2012 रोजी चालत्या बसमध्ये सहा जणांनी बलात्कार केला होता. तिला बेदम मारहाण करण्यात आली होती. त्यानंतर आता हैदराबाद बलात्कार आणि उन्नाव दुष्कर्म प्रकरण समोर आल्यानंतर नागरिकांच्या रागाला पारावार उरलेला नाही. 2017मध्ये सर्वोच्च न्यायालयानं दोषींची पुनर्विचार याचिका रद्द केलेली होती. 

टॅग्स :Nirbhaya Gang-rapeनिर्भया गॅंगरेप