शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आईने बक्षीस दिलेली जमीन परत द्या, कर्नाटक उच्च न्यायालयाचे डाॅक्टर मुलाला आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2024 06:03 IST

रायचूर येथील शोभा कुलकर्णी यांनी त्यांचा मुलगा डॉ. अनिल यास बंगळुरू येथील आपली जमीन बक्षीसपत्र करुन दिली. या जमिनीवर मुलाने नर्सिंग होम बांधले. म्हातारपणात मुलगा आपली काळजी घेईल, अशी त्यांना आशा होती.

- डॉ. खुशालचंद बाहेतीबंगळुरू : मुलाला जमीन देताना बक्षीसपत्रात वृद्ध आईची काळजी घेण्याची अट नसली तरीही ते मुलावर बंधनकारक आहे, असे कर्नाटक हायकोर्टाने म्हटले आहे. रायचूर येथील शोभा कुलकर्णी यांनी त्यांचा मुलगा डॉ. अनिल यास बंगळुरू येथील आपली जमीन बक्षीसपत्र करुन दिली. या जमिनीवर मुलाने नर्सिंग होम बांधले. म्हातारपणात मुलगा आपली काळजी घेईल, अशी त्यांना आशा होती.

तथापि, मुलाने तिची आणि वडिलांची काळजी घेण्यात पूर्णपणे अनास्था दर्शविली. वृद्धापकाळात त्यांना मूलभूत सुविधाही मुलगा पुरवत नव्हता. मुलाने काळजी घ्यावी म्हणून दिलेला तिचा अर्ज ज्येष्ठ नागरिक कल्याण समितीने फेटाळला. याला आईने हायकोर्टात आव्हान दिले.

मुलाचा युक्तिवाद होता की, त्याचे वडील सेवानिवृत्त रेंज फॉरेस्ट ऑफिसर होते. स्वतःची आणि पत्नीची काळजी घेण्यासाठी त्याच्याकडे पुरेशी संसाधने आणि पेन्शन आहे. याचिका प्रलंबित असताना वडील वारले असले तरी आईला कुटुंब निवृत्ती वेतन मिळते. पालकांची काळजी घेण्याची अट बक्षीसपत्रात  नाही. त्यामुळे आता ती लादता येणार नाही. हायकोर्टाने मुलाचे म्हणणे फेटाळले.

आई किंवा वडिलांनी एखादी मालमत्ता भेट दिल्यास त्यांची संतती म्हातारपणात त्यांच्या गरजा पूर्ण करतील, अशी वाजवी अपेक्षा असते, असे समजले जाऊ शकते. केवळ बक्षीसपत्रात म्हातारपणी आईची काळजी घेण्याची अट नाही म्हणून काळजी घेण्याचे बंधन नाही, हे म्हणणे अस्वीकार्य आहे.- न्यायमूर्ती सुरज गोविंदराज, कर्नाटक उच्च न्यायालय, कलबुर्गी 

टॅग्स :Courtन्यायालय