शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

निवृत्त प्राप्तिकर अधिकाऱ्यांची सेवा घेणार

By admin | Updated: January 14, 2017 01:48 IST

नोटाबंदीच्या ८ नोव्हेंबर २०१६ रोजीच्या निर्णयापासून ते ३० डिसेंबर २०१६ पर्यंत देशभरातील बँकांत १४ लाख कोटी रुपयांची रोकड जमा झाली

हरिष गुप्ता / नवी दिल्लीनोटाबंदीच्या ८ नोव्हेंबर २०१६ रोजीच्या निर्णयापासून ते ३० डिसेंबर २०१६ पर्यंत देशभरातील बँकांत १४ लाख कोटी रुपयांची रोकड जमा झाली असून यापैकी ३ ते ४ लाख कोटींचा काळा पैसा असावा, असा सरकारचा अंदाज आहे.या काळ्या पैशांचा छडा लावून त्यातून कर आणि दंडासह अतिरिक्त २ लाख कोटी रुपयांची वसुली करता येईल, जेणेकरून सरकारच्या तिजोरीत भर पडावी, या उद्देशाने या जमा रकमेसोबत विविध बँकांत दाखल करण्यात आलेल्या दस्तावेजांची काटेकोरपणे तपासणी करण्यासाठी ५० हजार ते १ लाख निवृत्त आयकर अधिकाऱ्यांची सेवा घेण्याचा सरकारचा बेत आहे. आयकर विवरणासह बँकेत जमा करण्यात आलेल्या दस्तावेजांची शहानिशा करण्याचे हे काम सहा महिन्यांच्या आत उरकण्याचा सरकारचा इरादा आहे. आयकर विवरणासह विविध बँकेत नोटाबंदीच्या काळात जमा रकमेसोबत दाखल करण्यात आलेल्या ट्रकभर दस्तावेजांचे आकलन करण्याचे अवाढव्य काम हाती घेण्यात आलेले आहे. या पन्नास दिवसांच्या अवधीत विविध बँकात १४ लाख कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. देशभरातील ५०० मुख्य आयकर आयुक्तांना आपापल्या विभागातील किती निवृत्त अधिकारी, कर्मचारी सेवा देण्यास तयार आहेत, याची अंतिम यादी करण्यास सांगण्यात आल्याचे समजते. करदात्याने रिटर्न दाखल केल्यानंतर तीन महिन्यांत त्याचे निर्धारण झाले पाहिजे असा निश्चय पंतप्रधान कार्यालयाने केला आहे. सरकारने यासंदर्भात दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार कर निर्धारणाची प्रक्रिया प्रदीर्घकाळ चालायला नको, तसेच कर अधिकारी आणि करदाता यांच्यात समोरासमोर भेटही व्हायला नको. सगळा संपर्क आणि शंकांचे निरसन हे ई-मेल्सद्वारेच व लेखी व्हावे. कर कार्यालयांतील ‘इन्स्पेक्टर राज’ टाळण्यासाठी ही खबरदारी घ्यायचा उद्देश आहे.