शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टर दाम्पत्य 12 दिवस डिजिटल अरेस्ट; CBI अधिकारी असल्याचे भासवून 2 कोटी रुपये लुटले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 20:19 IST

या प्रकरणाचा तपास सायबर पोलिस करत आहेत.

Digital Arrest: गेल्या काही काळापासून डिजिटल अरेस्टच्या अनेक घटना घडत आहेत. पोलिस आणि सरकार सातत्याने याबाबत लोकांना जागरुक करत आहेत. पण, तरीदेखील अनेकजण या यासबर ठगांच्या जाळ्यात अडकून आपले मोठे आर्थिक नुकसान करुन घेतात. आता ताजी घटना बिहारची राजधानी पाटणा येथून समोर आली आहे. एका निवृत्त डॉक्टर जोडप्याला सायबर आरोपींनी १२ दिवस डिजिटल अटकेत ठेवले अन् तब्बल १ कोटी ९५ लाख रुपये लुटले.

मिळालेल्या माहितीनुसार, पाटणातील हनुमान नगर भागात राहणाऱ्या निवृत्त डॉक्टर जोडप्याला १२ दिवस घरात डिजिटल अरेस्ट करण्यात आले होते. सायबर गुन्हेगारांनी बनावट सीबीआय अधिकारी, न्यायाधीश आणि वकील असल्याचे भासवून या जोडप्याकडून १ कोटी ९५ लाख रुपय लुटले. आपली फसवणूक झाल्याचे समजताच या जोडप्याने सायबर पोलिस ठाण्यात लेखी अर्ज दिला. सध्या पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

अशा प्रकारे फसवलेडिजिटल अटकेचे बळी ठरलेले डॉ. राधे मोहन प्रसाद यांचे पुत्र डॉ. सौरभ यांनी सांगितले की, २१ मे रोजी त्यांचे वडील डॉ. राधे मोहन प्रसाद यांना मुंबईहून एक फोन आला. फोन करणाऱ्याने स्वतःला सीबीआय अधिकारी असल्याचे सांगून, मुंबईच्या कुलाबा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याची भीती घातली. यानंतर, फोन करणाऱ्याने वडिलांना कुलाबा पोलिस ठाण्याचा नंबर दिला. वडिलांनी फोन केला असता, डॉ. राधा मोहन प्रसाद यांच्याविरुद्ध मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सांगितले.

१ कोटी ९५ लाख रुपये ट्रान्सफर केलेत्या लोकांनी व्हिडिओ कॉल देखील केला, ज्यामध्ये पोलिसांच्या गणवेशातील लोकही होते. सायबर गुन्हेगारांनी अटकेची भीती दाखवून डॉक्टर दाम्पत्याला आपल्या जाळ्यात ओढले. तुम्ही पैसे पाठवले नाहीत तर तुम्हाला अटक केली जाईल, अशी धमकी दिली. घाबरलेल्या दाम्पत्याने सहा वेळा आरटीजीएसद्वारे १ कोटी ९५ लाख रुपये आरोपींच्या खात्यात ट्रान्सफर केले. मात्र, पैसे ट्रान्सफर झाल्यानंतर जोडप्याला त्यांची फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी सायबर पोलिस ठाण्याला संपूर्ण प्रकरणाची लेखी माहिती दिली. 

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमBiharबिहारdigitalडिजिटलfraudधोकेबाजी