शहरं
Join us  
Trending Stories
1
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
2
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
3
Video : ६०० वर्षांनंतर पहिल्यांदाच! भूकंपानंतर ज्वालामुखीचा उद्रेक; रशियाच्या कामचटकाचा धोका अजूनही टळेना
4
आंध्र प्रदेशातील ग्रॅनाइट खाणीत मोठी दुर्घटना, ६ स्थलांतरित कामगारांचा मृत्यू, ३ जखमी
5
सुरक्षित गुंतवणुकीसह जबरदस्त रिटर्न! कमाईची उत्तम संधी आहेत या ५ स्कीम; मिळेल ८% पेक्षा जास्त व्याज
6
वसईची भयंकर घटना, मुंबईला धोक्याची घंटा!
7
मनसे, उद्धवसेना, शेकाप, राष्ट्रवादी एकत्र आले म्हणजे..?
8
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
9
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
10
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
11
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
12
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
13
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
14
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
15
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
16
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
17
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
18
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
19
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
20
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान

जेईई अ‍ॅडव्हान्स्डचा निकाल केवळ ११.६९ टक्केच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2018 06:48 IST

इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) व नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी (एनआयटी) च्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या जेईई अ‍ॅडव्हान्स्ड परीक्षेचा निकाल रविवारी जाहीर करण्यात आला.

नवी दिल्ली - इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) व नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी (एनआयटी) च्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या जेईई अ‍ॅडव्हान्स्ड परीक्षेचा निकाल रविवारी जाहीर करण्यात आला.केवळ ११.६९ टक्के विद्यार्थी पास झाले असून, त्यात हरयाणातल्या पंचकुल येथील प्रणव गोयल हा देशातून पहिला आला आहे. त्याला ३६० पैैकी ३३७ गुण मिळाले आहेत. तर मुलींमध्ये कोटा येथील मीनल पारेख ही पहिली आली असून, तिला ३१८ गुण मिळाले आहेत.आयआयटी, एनआयटी प्रवेशाची परीक्षा कठीणया परीक्षेत दुसरा क्रमांक कोटा येथील साहिल जैैन व तिसरा क्रमांक दिल्लीच्या कैलाश गुप्ता याने पटकाविला आहे. देशभरातील २३ आयआयटी व एनआयटीच्या प्रवेशांसाठी ही परीक्षा २० मे रोजी आॅनलाइन घेण्यात आली होती. देशभरातून या परीक्षेला बसलेल्या १,५५,१५८ मुलांपैैकी १८ हजार १३८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेत एकूण १६,०६२ विद्यार्थी व २०७६ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या. सर्वसाधारण गटातील ८७९४, अन्य मागासवर्गीय गटातून ३१४०, अनुसूचित जातींमधून ४७०९, अनुसूचित जमाती गटामधून १४९५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.अनुसूचित जाती गटातून कोटा येथील आयुष कदम, अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांतून हैदराबादचा जटोथ शिवा तरुण, अन्य मागासवर्गीय प्रवर्गातून विजयवाडा येथील मयूरी सिवा कृष्णा मनोहर हिने पहिला क्रमांक पटकाविला आहे.आयआयटी व एनआयटीच्या जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेला बसण्याची दोनदा संधी दिली जाते. आता आयआयटी व एनआयटीमध्ये प्रवेश देण्याची प्रक्रिया आता १५ जूनपासून सुरू होईल. प्रत्येक ठिकाणी किती जागा उपलब्ध आहेत त्यानुसार हे प्रवेश दिले जाणार आहेत.मुंबईतील ऋषी अग्रवाल राज्यात पहिलाआयआयटी व एनआयटी प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या जेईई अ‍ॅडव्हान्स्ड परीक्षेत मुंबईतील ऋषी अग्रवाल महाराष्ट्रातून पहिला आला आहे. परळ भोईवाडा येथील ऋषीला ३६० पैकी ३१५ गुण मिळाले. लीलावतीबाई पोदार शाळेचा तो विद्यार्थी आहे. त्याला खेळाची आवड असून, कराटे या क्रीडाप्रकारात त्याने अनेक पदके प्राप्त केली आहेत.सुपर-३०मध्ये ‘आनंद’आयआयटीसाठी गरीब विद्यार्थ्यांकडून तयारी करून घेण्यासाठी आनंद कुमार यांनी बिहारमध्ये सुरू केलेल्या सुपर-३० या संस्थेचे ३० पैकी२६ विद्यार्थी पास झाले. त्यामुळे तेथेही जल्लोष करण्यात आला.मुंबई विभागातील पाच गुणवंतविद्यार्थी क्रमांकऋषी अग्रवाल ०८अभिनवकुमार १२सौम्या गोयल १३अनुज श्रीवास्तव २५पार्थ लतुरिया २९

टॅग्स :examपरीक्षाnewsबातम्याIndiaभारत