शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

‘कॅट’चा निकाल जाहीर

By admin | Updated: December 28, 2014 01:10 IST

व्यवस्थापन शिक्षण संस्थांमधील प्रवेशांसाठी १६ व २२ नोव्हेंबर रोजी घेण्यात आलेल्या सामायिक प्रवेश परिक्षेचा (कॅट) निकाल शनिवारी सायंकाळी जाहीर करण्यात आला.

नवी दिल्ली : नव्याने सुरु होणाऱ्या सहांसह देशातील १९ ‘इंडियन इन्स्टिट्यूट्स आॅफ मॅनेजमेंट’ (आआयएम) आणि अन्य व्यवस्थापन शिक्षण संस्थांमधील प्रवेशांसाठी १६ व २२ नोव्हेंबर रोजी घेण्यात आलेल्या सामायिक प्रवेश परिक्षेचा (कॅट) निकाल शनिवारी सायंकाळी जाहीर करण्यात आला.परीक्षा दिलेले १.६८ लाख विद्यार्थी दुपारपासून निकालाची वाट पाहात होते. अखेर सा. ७ च्या सुमारास निकाल जाहीर झाले तेव्हा ते आॅनलाइन पाहण्यासाठी एवढी गर्दी झाली की निकालाची ्र्रेूं३.ंू.्रल्ल ही वेबसाइट बराच वेळ क्रॅश झाली. निकाल अधिकृतपणे जाहीर करताना परीक्षेचे निमंत्रक डॉ. रोहित कपूर म्हणाले, यंदा एकूण १६ परीक्षार्थींनी १०० पर्सेंटाईल गुण मिळविले. मात्र यात आयआयटींतील कितीजण आहेत हे स्पष्ट होऊ शकले नाही. गेल्या वर्षी आठ विद्यार्थ्यांनी १०० तर १० जणांनी ९९.९९ पर्सेंटाईल गुण मिळाले होते. यंदा परीक्षेचा पॅटर्न बदलण्यात आला. गुणांच्या ‘नॉर्मलायझेशन’च्या गेल्या वर्षीच्या पद्धतीवरून कोर्टकज्जे झाले होते. त्यामुळे यावेळी त्यातही सुधारणा केली गेली होती. (लोकमत न्यूज नेटवर्क)मुंबई : इंडियन इन्स्टियूट आॅफ मॅनेजमेंट आणि बी स्कूल मॅनेजमेंट अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या कॉमन अ‍ॅडमिशन टेस्ट (कॅट) परीक्षेचा निकाल शनिवारी संध्याकाळी सात वाजता जाहीर होणार होता. परंतु निकाल वेबसाईट हँग झाल्याने विद्यार्थ्यांना निकाल पाहता आला नाही. इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंटतर्फे १६ आणि २२ नोव्हेंबर रोजी घेण्यात आलेल्या कॅट परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात येणार होता. वेबसाईट हँग झाल्याने रात्री उशिरापर्यंत अनेकांना निकाल पाहता आला नाही. याबाबत आयआयएम अधिकाऱ्यांशी संपर्क होऊ शकला नाही. ९९ शहरांमधील ३५४ केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली. परीक्षेसाठी १ लाख ९६ हजार ९५१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १ लाख ७ हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे.