शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
3
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
4
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
5
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
6
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
7
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
8
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
9
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
10
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
11
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
12
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
13
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
14
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
15
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
16
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
17
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
18
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
19
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
20
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...

भविष्य निर्वाह निधीची रक्कम काढण्यासंबंधीचे निर्बंध ३१ जुलैनंतर लागू

By admin | Updated: April 19, 2016 18:50 IST

भविष्य निर्वाह निधीतली 1 मेपासून लागू होणार निर्बंध आता 31 जुलैनंतर लागू होणार आहेत.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, १९- केंद्रीय कामगार मंत्रालयाकडून सादर करण्यात आलेल्या पीएफ संबंधीच्या नव्या प्रस्तावाला अनेक स्तरातून विरोध झाला आहे. त्यामुळे या प्रस्तावाला 3 महिन्यांसाठी स्थगिती देण्यात आली. भविष्य निर्वाह निधीतली 1 मेपासून लागू होणार निर्बंध यामुळे 31 जुलैनंतर लागू होणार आहेत. आम्ही याबाबत संबंधितांशी चर्चा करून निर्णय घेऊ,  असं आश्वासन केंद्रीय कामगार मंत्री बंडारू दत्तात्रेय यांनी दिलं आहे. कामगार मंत्रालयाने सोमवारी भविष्य निर्वाह निधी खात्यातील (पीएफ) रक्कम काढण्यावरील निर्बंध शिथील केले होते. त्यामुळे आता घर खरेदी, व्यक्तीच्या गंभीर आजारावरील उपचार, पाल्याचे अभियांत्रिकी शिक्षण या कारणांसाठी नोकरदार वर्गाला पीएफची संपूर्ण रक्कम खात्यातून काढता येणार आहे. येत्या १ मेपासून याबाबतचा नवा नियम लागू होणार होता. मात्र तो आता 31 जुलैमध्ये लागू होणार आहे. पीएफची संपूर्ण रक्कम काढण्यासाठी वयाची ५८ वर्षं पूर्ण होईपर्यंत थांबावे लागणा-या लोकांना यामुळे दिलासा मिळणार आहे. पीएफची रक्कम काढताना त्यावर कर आकारण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. मात्र त्याला मोठ्या प्रमाणावर विरोध झाला. त्यामुळे केंद्राने हा प्रस्ताव मागे घेतला. त्यापैकी संपूर्ण रक्कम काढता न येण्याचा निर्णय कायम राखण्यात आला आहे. आतापर्यंत असलेल्या नियमानुसार कर्मचारी नोकरी सोडल्यावर दोन महिने बेरोजगार राहिल्यास त्याला पूर्ण रक्कम काढण्याचा अधिकार होता. पण आता अशा कर्मचा-यांना ‘पीएफ’मध्ये फक्त पगारातून जमा झालेली रक्कम काढता येईल. मालक किंवा कंपनीकडून आलेली रक्कम काढता येणार नसल्याचं यावेळी केंद्रीय कामगार मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे. त्याप्रमाणेच कामगार मंत्रालयानं महिला नोकरदारांना विशेष सवलत दिली आहे. महिलेने लग्न, गरोदरपण आणि बाळाच्या जन्मासाठी नोकरी सोडल्यास दोन महिन्यांच्या कालावधीनंतरही संपूर्ण रक्कम मिळू शकणार आहे.