शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Jammu and Kashmir : मोदी सरकारचा ऐतिहासिक विजय, लोकसभेतही कलम 370 रद्द करण्याचे विधेयक मंजूर  

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2019 19:41 IST

लोकसभेतही कलम 370 रद्द करण्याचे प्रस्तावित विधेयक मंजूर करण्यात आले.

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 हटविण्याचे प्रस्तावित विधेयक सोमवारी राज्यसभेत मंजूर करण्यात आले. यानंतर आज लोकसभेत कलम 370 वर वादळी चर्चा झाल्यानंतर हे विधेयक 351 विरुद्ध 72 मताधिक्याने पारित झाले. त्यामुळे केंद्रातील मोदी सरकारचा ऐतिहासिक विजय झाला आहे. 

मंगळवारी लोकसभेत जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 रद्द करण्याबद्दल वादळी चर्चा झाली. यावेळी विरोधकांनी अनेक प्रश्न विचारत हे कलम रद्द करण्यास विरोध दर्शविला. यावेळी या विधेयकावर जोरदार चर्चा झाली. त्यानंतर यावर मतदान घेण्यात आले, असता  हे विधेयक  351 विरुद्ध 72 मताधिक्याने मंजूर करण्यात आले. 

तत्पूर्वी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विरोधकांना उत्तर देताना पंतप्रधान दिवंगत पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यामुळे पाकव्याप्त काश्मीरची निर्मिती झाल्याचे सांगत काँग्रेसवर टीका केली. जम्मू-काश्मीरचा मुद्दा पंडित जवाहरलाल नेहरू संयुक्त राष्ट्र संघात नेला. त्यांनी जम्मू-काश्मीरमधील कलम 370 मर्यादित काळासाठी असल्याचे सांगितले. मात्र, ते हटवण्यासाठी 70 वर्षे लागली.

कलम 370 मुळे जम्मू-काश्मीर भारतापासून दूर होते. आता कलम 370 हटविल्यामुळे काश्मीरबद्दल सर्व अधिकार संसदेला असणार आहेत. तसेच, कलम 371 रद्द करण्याचा केंद्र सरकारचा कोणताही इरादा नाही. कारण, कलम 370 आणि कलम 371 यांच्यातील फरक जनतेला माहीत आहे. कलम 370च्या आधारे पाकिस्तानकडून फुटीरतावादी चळवळीला खतपाणी घाल्यात येत आहे, अमित शहा यांनी सांगितले. 

पाकधार्जिण्यांसोबत चर्चा कशासाठी करायची, असा सवाल करत अमित शहा म्हणाले, काश्मीर खोऱ्यातील जनता आपली आहे. त्यांच्याशी आम्ही कायम संवाद राहणार आहोत. काश्मीरमधील परिस्थिती बिघडू नये म्हणून कर्फ्यू लावण्यात आला आहे. कायदा, सुव्यवस्था कायम राखण्यासाठी इंटरनेट बंद करण्यात आले आहे. तसेच, येथील जनतेची दिशाभूल करणाऱ्यांचा प्रयत्न हाणून पाडू, असे अमित शहा म्हणाले.

कलम 370 मुळे जम्मू- काश्मीरमधील युवकांना रोजगार मिळाले का? शिक्षण, आरोग्य मिळाले का? असा सवाल अमित शहा यांनी केला. तसेच, 370 हटविल्यामुळे जम्मू-काश्मीरमधील युवकांचे भले होईल. काश्मीरच्या पर्यावरणाची योग्य ती काळजी घेण्यात येईल. पृथ्वीवरचा स्वर्ग ही काश्मीरची ओळख कायम ठेवू, असे आश्वासनही अमित शहा यांनी लोकसभेत दिले.  

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरArticle 370कलम 370