शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

मोदी सरकारने थेट घेतलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्याचा राजीनामा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2020 01:57 IST

Resignation of a senior officers : केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत ६०० अर्जांतून १० जणांची निवड मोदी सरकारने केली होती.

- हरीश गुप्ता

नवी दिल्ली : खाजगी क्षेत्रातील उत्तमोत्तम तज्ज्ञ प्रशासनात यावेत यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी प्रयोगांतर्गत थेट संयुक्त सचिवपदी भरण्यात आलेल्या ९ अधिकाऱ्यांपैकी एका अधिकाऱ्याने राजीनामा दिला आहे.सूत्रांनी सांगितले की, अरुण गोयल असे या अधिकाऱ्याने नाव असून एप्रिल २०१९ मध्ये त्यांना थेट संयुक्त सचिवपदी नियुक्ती देण्यात आली होती. शासकीय खाक्या पचनी न पडल्यामुळे त्यांनी सेवा सोडली.केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत ६०० अर्जांतून १० जणांची निवड मोदी सरकारने केली होती. तथापि, काकोली घोष यांनी रुजू होणेच टाळले होते. आता गोयल यांनी राजीनामा दिला आहे. मोदी यांच्या पुढाकाराला त्यामुळे मोठा धक्का बसला आहे. २०२० मध्ये ५० तज्ज्ञांना संयुक्त सचिवपदी नेमणुका देण्याची मोदींची योजना होती. तथापि, कोविड-१९ मुळे ती यशस्वी होऊ शकली नाही.डॉ. मनमोहनसिंग यांना १९७२ मध्ये वित्त मंत्रालयात, विजय एल. केळकर यांना १९९४ मध्ये पेट्रोलियम मंत्रालयात, बिमल जालान यांना १९९१ मध्ये वित्त सचिव पदावर, राकेश मोहन यांना २००४ मध्ये अर्थव्यवहार सचिव पदावर आणि राम विनय शाही यांना २००२ मध्ये ऊर्जा सचिव पदावर थेट नियुक्त्या देण्यात आल्या होत्या.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी