नगरमध्ये प्रेमीयुगलाकडून विष प्राशन पुण्याचे रहिवासी : तरुणाचा मृत्यू, महिला अत्यवस्थ
By admin | Updated: February 29, 2016 00:07 IST
अहमदनगर : पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वरजवळील खडकवाडी शिवारात विवाहित प्रेमीयुगलाने विष घेतल्याची घटना रविवारी दुपारी घडली़ यात तरुणाचा मृत्यू झाला असून, महिला अत्यवस्थ आहे़ उत्तम चिंतामण मिंढे (३५) असे यातील मृताचे नाव आहे.
नगरमध्ये प्रेमीयुगलाकडून विष प्राशन पुण्याचे रहिवासी : तरुणाचा मृत्यू, महिला अत्यवस्थ
अहमदनगर : पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वरजवळील खडकवाडी शिवारात विवाहित प्रेमीयुगलाने विष घेतल्याची घटना रविवारी दुपारी घडली़ यात तरुणाचा मृत्यू झाला असून, महिला अत्यवस्थ आहे़ उत्तम चिंतामण मिंढे (३५) असे यातील मृताचे नाव आहे.तर महिला अत्यवस्थ असल्याने तिला नगर येथे उपचारासाठी पाठविण्यात आले़ दोघेही वाघोली (जि.पुणे) येथे राहात होते.