शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

समुद्रयानाद्वारे संशोधक जाणार सागराच्या तळाशी; भारताची नवी मोहीम, खनिज साठ्यांचा घेणार शोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2021 05:56 IST

त्या समुद्रयानात एकच व्यक्ती बसू शकत असे. 

लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : अंतराळ यानाद्वारे माणसाला अवकाशात धाडण्यासाठी भारताने गगनयान मोहीम हाती घेतली असतानाच, दुसऱ्या बाजूला समुद्राच्या अथांग तळातील खनिज साठे शोधण्याकरिता व इतर रहस्ये उलगडण्यासाठी केंद्र सरकारने समुद्रयान मोहिमेलाही प्रारंभ केला आहे. ही माहिती केंद्रीय पृथ्वी विज्ञान खात्याचे राज्यमंत्री  जितेंद्रसिंह यांनी राज्यसभेत दिली. 

यासंदर्भातील एका प्रश्नाला दिलेल्या उत्तरात ते म्हणाले की, समुद्राच्या तळात दडलेले खनिजांचे साठे शोधणे, जीवसृष्टीचा अभ्यास करण्याकरिता समुद्रयान मोहीम हाती घेण्याआधी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशन टेक्नॉलॉजी (एनआयओटी) या संस्थेने एक पर्सनल स्फेयर यान बनविले होते. ते समुद्रात ५०० मीटर खोल जाऊ शकते. त्या समुद्रयानात एकच व्यक्ती बसू शकत असे. 

पर्सनल स्फेयर यान ही २.१ मीटर व्यासाची पाणबुडी आहे. ती माइल्ड स्टीलपासून बनविण्यात आली आहे. या स्फेयर यानाचे बंगालच्या खाडीमध्ये काही दिवसांपूर्वीच परीक्षण करण्यात आले. ते यशस्वी ठरल्यानंतर समुद्रयान प्रकल्पाच्या अंमलबजावणीला हिरवा कंदील दाखविण्यात आला. तळाशी जाऊन खनिज साठे शोधण्यासाठी  आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या अमेरिका. रशिया, फ्रान्स, जपान, चीन या देशांमध्ये आता भारताचाही समुद्रयान प्रकल्पामुळे समावेश झाला आहे. समुद्रात खोलवर जाऊन तेथील स्थितीचे परीक्षण करण्यासाठी या देशांकडे विशेष प्रकारच्या पाणबुड्या आहेत. भारताकडेही तशाच प्रकारची पाणबुडी उपलब्ध झाली आहे. 

टॅग्स :Parliamentसंसद