कुरेशी समाजाचे तहसीलदारांना निवेदन
By admin | Updated: February 14, 2015 23:50 IST
औसा : शहरातील कुरेशी जमातीसह तालुक्यातील मुस्लिम बांधव आणि सामाजिक संघटनांच्या वतीने शुक्रवारी तहसीलदारांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले़
कुरेशी समाजाचे तहसीलदारांना निवेदन
औसा : शहरातील कुरेशी जमातीसह तालुक्यातील मुस्लिम बांधव आणि सामाजिक संघटनांच्या वतीने शुक्रवारी तहसीलदारांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले़ यावेळी कुरेशी समाजाचे अध्यक्ष इसामुद्दिन कुरेशी, उपाध्यक्ष उस्मान कुरेशी, माजी नगरसेवक मुक्तदार कुरेशी, अन्वर कुरेशी, खुद्दुस कुरेशी, जावेद कुरेशी, इलियास चौधरी, अबू सौदागर, वहीद कुरेशी, नसीर कुरेशी आदींची उपस्थिती होती़ तसेच उपनगराध्यक्ष डॉ़ अफसर शेख, माजी नगराध्यक्ष मुजिबोद्दिन पटेल, शकिल शेख, शब्बीर शेख, फारूख शेख, मौलाना कलीमुल्ला, एमआयएमचे शहराध्यक्ष मुजफ्फरअली इनामदार, ॲड़ शाहनवाज पटेल, असलमखाँ पठाण, खुनमीर मुल्ला, अंगद कांबळे यांची उपस्थिती होती़कुरेशी समाजातील व्यापार्यांनी ५ फेब्रुवारीपासून जनावरांची खरेदी विक्री व्यवहार बंद केले आहेत़ कुरेशी समाजाला जातीचे प्रमाणपत्र देण्यात यावे़ न्यायमूर्ती सच्चर समिती व रंगनाथन मिश्र समितीच्या शिफारसींची त्वरित अंमलबजावणी करण्यात यावी़ महाराष्ट्रातील मुस्लिम समाजाला ५ टक्के आरक्षण देण्यात यावे, अशा मागण्या करण्यात आल्या़