शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
2
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
3
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
4
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
5
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
6
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
7
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
8
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
9
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
10
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
11
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
12
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
13
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
14
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"
15
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
16
२५ वर्षीय CA तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; 'हेलियम गॅस' शरीरात घेत आयुष्याचा शेवट केला, कारण...
17
Stock Market Today: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा सपाटा, Sensex २७१ अंकांनी घसरला; IT-मेटल स्टॉक्स कमकुवत
18
"सलमानने चाकू माझ्या गळ्यावर धरला आणि जोरात...", अशोक सराफ यांनी सांगितला भाईजानचा तो प्रसंग
19
भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात
20
FD-RD झाली जुनी, आता ‘या’ ५ स्कीम्सची चर्चा; वर्षभरात तगडा नफा हवा असेल तर ही डिटेल्स तपासा

प्रजासत्ताक दिनी Fighter Jet 'गरजणार'; PM मोदी-राष्ट्रपती मॅक्रॉन यांच्यासमोर राफेल-सुखोईसह ही विमानं कमाल दाखवणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2024 11:08 IST

यावेळची प्रजासत्ताक दिनाची परेड अत्यंत विशेष असणार आहे.

भारताच्या 75व्या प्रजासत्ताक दिनाच्या समारंभासाठी फ्रन्सचे राष्ट्रपती इमॅनुएल मॅक्रॉन हे मुख्य अतिथी म्हणून सहभागी होणार आहेत. फ्रान्सचे राष्ट्रपती गुरुवारी (२५ जानेवारी) दुपारी राजस्थानची राजधानी असलेल्या जयपूरमध्ये पोहोचतील. ते दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर येत आहेत. ते येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत आमेर किल्ला, हवा महल आणि जंतरमंतरला भेट देतील. महत्वाचे म्हणजे, यावेळची प्रजासत्ताक दिनाची परेड अत्यंत विशेष असणार आहे.

यावेळी 75 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त भारतीय हवाई दलाची 51 विमाने कर्तव्यपथवरून उड्डाण करणार आहेत. यावेळी प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये हवाई दलाच्या संचलन तुकडीचे नेतृत्व महिला अधिकाऱ्यांकडे देण्यात आले आहे. स्क्वाड्रन लीडर रश्मी ठाकुर, सुमिता यादव, प्रतीति अलहुवालिया आणि फ्लाइट लेफ्टनन्ट कीर्ति रोहिल संचलन तुकडीचे नेतृत्व करतील. हवाई दलाच्या संचलनात 144 हवाई योद्धा सहभाग घेणार आहेत.

मॅक्रॉन-मोदी यांच्या डोक्यावरून उडणार लढावू विमानं -प्रजासत्ताक दिनानिमित्त कर्तव्यपथावर लढाऊ विमानांची एक संपूर्ण तुकडी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्रपती मॅक्रॉन यांच्या डोक्यावरून जाईल. 29 लढाऊ विमाने, आठ मालवाहू विमाने, 13 हेलिकॉप्टर्स आणि एक हेरिटेज विमान, अशी एकूण 51 हवाई दलाची विमानं वेगवेगळ्या पद्धतीच्या हवाई कसरती करताना दिसतील. यात राफेल, सुखोई-30, जग्वार, सी-130 आणि तेजस विमानांचा समावेश असेल.

असा असेल मायक्रॉन यांचा दौरा -पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, राष्ट्रपती मॅक्रॉन दुपारी अडीच वाजता जयपूर विमानतळावर पोहोचतील. यानंतर ते जयपूरमध्येच राहणार आहे. सायंकाळी 5.30 वाजता पंतप्रधान मोदी त्यांचे स्वागत करतील. यानंतर, दोन्ही नेते जंतरमंतर, हवा महलसह सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्त्वाच्या ठिकाणांना भेटी देतील. मोदी आणि मॅक्रॉन यांचा रोड शो देखील होणार आहे. संध्याकाळी 7.15 वाजता दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय चर्चा होणार आहे. यात संरक्षण, व्यापार, भारतीय विद्यार्थ्यांसाठी व्हिसा आदी विषयांवर चर्चा होणार आहे.

द्विपक्षीय चर्चेनंतर राष्ट्रपती मॅक्रॉन रात्री 8.50 वाजता दिल्लीला रवाना होतील. दुसऱ्या दिवशी सकाळी ते प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये सहभागी होणार आहेत. परेडमध्ये सहभागी झाल्यानंतर ते हॉटेलमध्ये परततील. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या वतीने राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती मॅक्रॉन यांच्यासाठी विशेष मेजवानीचे आयोजन करण्यात आले आहे. यात सहभागी झाल्यानंतर ते शुक्रवारी रात्री 10.05 वाजता दिल्लीहून पॅरिसला रवाना होतील. 

टॅग्स :Republic Dayप्रजासत्ताक दिन २०२४Narendra Modiनरेंद्र मोदीFranceफ्रान्सairforceहवाईदल