प्रजासत्ताक दिन - १० महत्त्वाच्या घटना
By admin | Published: January 26, 2015 02:40 PM2015-01-26T14:40:47+5:302015-01-26T14:40:47+5:30
२६ जानेवारी १९५० या प्रजासत्ताक दिनाचं महत्त्व सांगणा-या महत्त्वाच्या घटना...
Next
>१. २६ जानेवारी १९५० रोजी भारताची राज्यघटना अस्तित्वात आली.
२. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखालील २९९ जणांच्या टीमने नवी राज्यघटना बनवण्याचे शिवधनुष्य पेलले.
३. डॉ. राजेंद्र प्रसाद या दिवशी भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून निवडले गेले.
४. जम्मू व काश्मिरमधल्या कारवाईत शहीद झालेल्या जवानांना परमवीर चक्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
५. शंभरपेक्षा जास्त विमानांनी हवाई प्रात्यक्षिके करत परेडमध्ये सहभाग घेतला. यामध्ये हार्वर्डस, डाकोतास, लायबरेटर्स, टेम्पेस्ट, स्पिटफायर्स व जेट या विमानांचा समावेश होता.
६. रॉयल हा शब्द वगळून हवाई दलाचा उल्लेख इंडियन एअर फोर्स असा करण्यात आला.
७. पहिल्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी देशाला संबोधित केले.
८. १९५० च्या पहिल्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडला इंडोनेशियाचे अध्यक्ष सुकर्णो हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
९. सारनाथ येथील अशोक चक्रावरील सिंहाची प्रतिकृती राष्ट्रीय मानचिन्ह म्हणून स्वीकारण्यात आले.
१०. २६ जानेवारी १९६३ मध्ये मोर हा राष्ट्रीय पक्षी म्हणून घोषित करण्यात आला.