शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

"अहवाल अद्याप तयार नाही;" कोरोना विषाणूच्या उत्पत्तीच्या तपासावर WHO कडून स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2021 10:37 IST

WHO : आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांनी केला होता चीनचा दौरा, तज्ज्ञांच्या अहवालावर अनेकांचं लक्ष

ठळक मुद्देआंतरराष्ट्रीय तज्ज्ञांनी केला होता चीनचा दौरातज्ज्ञांच्या अहवालावर अनेकांचं लक्ष

कोरोना विषाणूच्या उत्पत्तीच्या तपासासाठी चीनला गेलेल्या आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांच्या विशेष टीमनं आपला अहवाल प्रकाशित करण्याचं तुर्तास टाळलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं दिलेल्या माहितीनुसार आता हा अहवाल पुढील आठवड्यात प्रकाशित केला जाण्याची शक्यता आहे. "सध्या हा अहवाल पूर्णपणे तार नाही. तज्ज्ञ आणि या टीममधील सदस्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार हा अहवाल पुढील आठवड्यात प्रकाशित होण्याची शक्यता आहे," अशी माहिती जागतिक आरोग्य संघटनेचे प्रवक्ते क्रिस्तियन लिंडमियर यांनी दिली. या अहावालाद्वारे करण्यात आलेले दावे आणि आरोपांबाबत तथ्यात्मक माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामध्ये कोरोना विषाणू पशूंमधून मानवात कसा आला यांसारख्या दाव्यांवरही माहिती मिळू शकते. आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांची टीम जवळपास एक महिना चीनमध्ये यावर शोध घेत होती. 

चीनमधील वुहान या शहरातून संपूर्ण देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पसरल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. काही तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार कोरोनाचा विषाणू वटवाघुळांमार्फत मानवामध्ये आला आहे, असा दावा करण्यात येत आहे. परंतु त्यांनी यावर अद्याप कोणतीही ठोस माहिती दिलेली नाही. तसाच कधी या विषाणूचा प्रसार झाला याबाबतही अद्याप कोणती ठोस माहिती मिळालेली नाही. दरम्यान, वुहानचा दौरा पूर्ण केल्यानंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांनी सध्या कोणत्याही निष्कर्षावर पोहोचू शकत नसल्याचं म्हटलं होतं. सध्या संपूर्ण जग जागतिक आरोग्य संघटनेच्या या अहवालाची प्रतीक्षा करत आहो. यामध्ये कोरोना विषाणूची उत्पत्ती, या प्रसार अशा अनेक गोष्टींवर प्रकाश पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, कोरोनाचा विषाणू चीनमधील वुहान प्रांतातूनच जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला असल्याचा दावा अनेकांकडून करण्यात आला आहे.  

टॅग्स :World health organisationजागतिक आरोग्य संघटनाchinaचीनcorona virusकोरोना वायरस बातम्या