शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

NRCतून नाव काढणं म्हणजे मतदार यादीतून नाव हटवणं नाही; निवडणूक आयोगाची 'गुगली'

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2018 21:27 IST

राष्ट्रीय नागरिकत्व नोंदयादीतून नाव काढणे म्हणजे मतदार यादीतून त्याचे नाव हटवल्याचा अर्थ होत नाही, असं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे.

नवी दिल्ली- राष्ट्रीय नागरिकत्व नोंदयादीतून नाव काढणे म्हणजे मतदार यादीतून त्याचे नाव हटवल्याचा अर्थ होत नाही, असं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे. आसाममध्ये गेल्या काही दिवसांपूर्वीच जवळपास 40 लाख लोकांचं राष्ट्रीय नागरिकत्व नोंदयादीतून नाव हटवलं होतं. त्यावर आता मुख्य निवडणूक आयुक्त ओ. पी. रावत यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.एनआरसीतून नाव काढणे म्हणजे मतदार यादीतून नाव हटवलं असं होत नाही, अशा प्रकारचा अर्थ कोणीही काढू नये, असंही निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे. एनआरसीचा एक मसुदा आहे. पुढच्या महिन्याभरात या सर्व 40 लाख लोकांना त्यांचं नावाचा समावेश का केला नाही, याचं कारण सांगितलं जाईल. तसेच ज्याचं नाव NRCतून हटवण्यात आलं आहे, ते ट्रिब्युनलमध्ये स्वतःचे आक्षेप आणि दावे दाखल करू शकतील. त्यानंतर एनआरसीचा अंतिम मसुदा जाहीर केला जाईल. आसामचे मुख्य निवडणूक अधिकारी पुढच्या महिन्यात एनआरसीच्या मसुद्यावर अहवाल देणार आहेत.एनआरसीतून नाव हटवल्याचा अर्थ असा नाही की त्यांचं नाव आसाममधल्या मतदार यादीतूनही हटवलं जाणार आहे. लोकप्रतिनिधी कायदा 1950 नुसार, मतदाराची नोंदणी करण्यासाठी तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्यात अर्जदारानं भारतीय नागरिक असणं, वय वर्षं 18च्या वर असणं आणि संलग्न विधानसभा मतदारसंघात नाव असणं या गोष्टींचा समावेश आहे. तसेच मतदार यादी आणि एनआरसीची यादी बनवण्याचं काम हे वेगवेगळं आहे. तसेच आसामचे निवडणूक अधिका-यांना याचा अहवाल लवकरात लवकर देण्यास सांगण्यात आलं आहे. जेणेकरून लोकसभा निवडणुकीच्या आधी म्हणजे 4 जानेवारी 2019ला मतदार यादीचा अंतिम मसुदा पूर्ण केला जाईल. 

टॅग्स :ElectionनिवडणूकNational Register of Citizensराष्ट्रीय नागरिकत्व नोंदयादी