पाटणा : पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांच्या दिवंगत आईचा ‘एआय’ व्हिडिओ हटवण्यासंदर्भात बुधवारी पाटणा उच्च न्यायालयाने काँग्रेस पक्षाला निर्देश दिले आहे. काँग्रेसने सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेल्या ‘एआय’ जनरेटेड व्हिडीओवर अक्षेप घेत दाखल केलेल्या याचिकांवर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने संबंधित निर्णय दिले.
काँग्रेसने सोशल मीडियावर टाकलेला व्हिडिओ त्यांची बदमानी करणार असून त्यामुळे लोकप्रतिनिधी कायद्याअंतर्गत राजकीय पक्षांवर लादलेल्या निर्बंधांचे उल्लंघन झाल्याचा आरोप संबंधित याचिकेत केला आहे.
फेसबुक, एक्सला न्यायालयाची नोटीस
याप्रकरणी पाटणा उच्च न्यायालयाने फेसबुक, एक्स, गुगल या सोशल मीडिया व्यासपीठांना नोटीस पाठवली आहे. पुढील सुनावणीच्या तारखेपर्यंत उत्तर देण्याचे निर्देश त्यांना दिले आहेत.
आईचा अनादर नाही
या प्रकरणाच्या पुढील सुनावणीपूर्वी हा व्हिडीओ सोशल मीडियावरून हटवण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत. मात्र, या व्हिडीओत पंतप्रधान मोदी किंवा त्यांच्या आईचा कोणत्याही प्रकारे अनादर झाला नसल्याचे स्पष्टीकरण देत काँग्रेसने या वादावर पडदा टाकला होता.