शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

गाडीसारखा मनातूनही लाल दिवा काढून टाका- नरेंद्र मोदी

By admin | Updated: April 30, 2017 12:23 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या "मन की बात" कार्यक्रमाच्या 31 व्या भागातून लाल दिव्याप्रति लोकांच्या असलेल्या रागाला त्यांनी वाट मोकळी करून दिली

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 30 - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या "मन की बात" कार्यक्रमाच्या 31 व्या भागातून लाल दिव्याप्रति लोकांच्या असलेल्या रागाला त्यांनी वाट मोकळी करून दिली आहे. केंद्र सरकारनं लाल दिवा हटवण्याचा निर्णय घेतला आहे. आता याचा लाभ घेणा-यांनी गाडीतूनच नव्हे, तर मनातूनही लाल दिव्याचा मोह काढून टाकावा. देशात VIP कल्चरचा द्वेष केला जातो. मात्र तो द्वेष एवढा खोलवर गेल्याचा मला आताच अनुभव झाला. न्यू इंडियात आता व्हीआयपीच्या ऐवजी EPI (Every Person is Important) वर भर देण्यात येणार आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तरुणांनाही आत्मचिंतनाचा सल्ला दिला आहे. परीक्षा आता संपलेल्या आहेत. तरुणांनी नवे कौशल्य आत्मसात करण्याचा प्रयत्न करावा, टेक्नॉलॉजीपासून दूर जात स्वतःसोबत वेळ घालवण्याचा प्रयत्न करा, संगीतासारखी वाद्ये शिका किंवा नवीन भाषा शिका, असं आवाहनही त्यांनी देशातील तरुणांना केलं आहे. कोणत्याही ठिकाणी गेल्यास तिथे खूप फिरा, कमीत कमी 3 ते 4 दिवस तिथे थांबा आणि मगच दुस-या ठिकाणी जा, नव्या ठिकाणी फिरण्यासाठी गेल्यास तिथे खूप शिकायला मिळते, फिरताना फोटो काढा आणि ते #IncredibleIndia सोबत शेअर करा, असंही ते म्हणाले आहेत. निसर्गाने सारे नियम बदलले आहेत. पूर्वी मे-जूनमध्ये उष्णता जाणवायची. आता मार्च-एप्रिलमध्ये तसा अनुभव येतो, जागतिक तापमान वाढ हा एकेकाळी शैक्षणिक अभ्यासाचा विषय होता. आज तो दैनंदिन अनुभवाचा विषय ठरला आहे. कधी कधी आपण एवढे कामात व्यस्त होतो की, उन्हाळ्याच्या दिवसात घरी आलेल्या पोस्टमनला साधे पाणीही विचारत नाही, मात्र असं न करता या कडक उन्हाळ्यात सगळ्यांना पाणी द्या, पाणी बचतीचं महत्त्व जपा, उन्हापासून स्वतःचं आणि आपल्या माणसांचं संरक्षण करा. 5 मे रोजी भारत दक्षिण आशिया सॅटेलाइट लाँच करणार असून, दक्षिण आशियासोबत सहकार्य वाढवण्यासाठी भारताचं हे महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचंही ते म्हणाले आहेत.