शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
4
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
5
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
6
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
7
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
8
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
9
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
10
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
11
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
12
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
13
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
14
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
15
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
16
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
17
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
18
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

११ लाख अपात्र शिक्षकांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 00:16 IST

मार्च २०१५ पर्यंत नेमणुका झालेल्या ज्या शिक्षकांकडे शिक्षणहक्क कायद्यानुसार ठरलेली शैक्षणिक अर्हता नाही त्यांना ती मिळवण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी मिळणार आहे.

नवी दिल्ली : मार्च २०१५ पर्यंत नेमणुका झालेल्या ज्या शिक्षकांकडे शिक्षणहक्क कायद्यानुसार ठरलेली शैक्षणिक अर्हता नाही त्यांना ती मिळवण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी मिळणार आहे. देशभरात असे ११ लाख शिक्षक असून अर्हतेअभावी त्यांच्या नोक-यांवर येणारे गंडांतर यामुळे तूर्तास टळणार आहे.शिक्षणहक्क कायदा २०१० मध्ये लागू झाला, तेव्हा विविध स्तरावरील शालेय शिक्षकांसाठी अ.भा. अध्यापक शिक्षण परिषदेने किमान अर्हता ठरवून द्यायची व शिक्षकांनी ती मार्च २०१५ पर्यंत प्राप्त करावी असे ठरले होते. यातूनच ‘टीईटी’सारख्या परीक्षा सुरू झाल्या. राज्यांना पुरेसे अर्हताप्राप्त शिक्षक मिळण्यास किंवा असलेल्या शिक्षकांना मुदतीत अर्हता मिळवण्यात अडचण आली तर केंद्र सरकारने प्रत्येक प्रकरणाचा गुणवत्तेवर विचार करून यात सवलत द्यायची, अशीही तरतूद कायद्यात होती.कायद्याची सात वर्षे अंमलबजावणी केल्यानंतर देशभरात अर्हता नसलेले सुमारे ११ लाख शिक्षक नोकरीत आहेत व त्यांना अर्हता मिळवण्यासाठी मुदतही शिल्लक नाही, असे दिसून आले. यातून मार्ग काढण्यासाठी अर्हतेसाठीची मुदत दोन वर्षांनी वाढविण्यासाठी कायद्यात दुरुस्ती करण्याचे केंद्र सरकारने ठरविले. यासाठीचे दुरुस्ती विधेयक लोकसभेने २२ जुलै तर राज्यसभेने १ आॅगस्ट रोजी मंजूर केले. यामुळे मार्च २०१५ पर्यंत नेमलेल्या शिक्षकांना अर्हता प्राप्त करण्यासाठी मार्च २०१९ पर्यंतची मुदत मिळेल.त्यांना प्रशिक्षण दिले जाईल - जावडेकरया ११ लाख शिक्षकांना आवश्यक अर्हता प्राप्त करण्यासाठी पुढील दोन वर्षांत नक्की प्रशिक्षित केले जाईल, अशी ग्वाही मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी चर्चेच्या उत्तरात दिली. हे प्रशिक्षण ‘स्वयंप्रभा’ योजनेखाली आॅनलाइन आणि आॅफलाइन पद्धतीने दिले जाईल.यासाठी १५ आॅगस्ट ते १५ सप्टेंबर या दरम्यान शिक्षकांनी नोंदणी करायची असून, प्रशिक्षण २ आॅक्टोबरपासून सुरू होईल.आॅनलाइनखेरीज ‘डीटीएच’ टीव्हीवरूनही प्रशिक्षण दिले जाईल. अभ्यासाचे साहित्य सीडीच्या स्वरूपातही मिळेल. वर्षातून एकदा १२ दिवसांचे प्रत्यक्ष प्रशिक्षणाचे वर्ग होतील.