शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

नेपाळमध्ये अडकलेल्या २०० यात्रेकरूंची सुटका, हेलिकॉप्टरने केल्या ३५ फेऱ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2018 04:23 IST

नेपाळच्या हिल्सा पर्वतीय भागातून भारताच्या २०० मानसरोवर यात्रेकरूंची सुटका करण्यात आली. तिबेटमधून परतणारे १,५०० यात्रेकरू मुसळधार पावसामुळे नेपाळच्या पर्वतीय भागांमध्ये मोठ्या संख्येने अडकले असून, त्यांची सुटका करण्यासाठी प्रयत्नांना गती देण्यात आली आहे.

काठमांडू : नेपाळच्या हिल्सा पर्वतीय भागातून भारताच्या २०० मानसरोवर यात्रेकरूंची सुटका करण्यात आली. तिबेटमधून परतणारे १,५०० यात्रेकरू मुसळधार पावसामुळे नेपाळच्या पर्वतीय भागांमध्ये मोठ्या संख्येने अडकले असून, त्यांची सुटका करण्यासाठी प्रयत्नांना गती देण्यात आली आहे.भारतीय दूतावासाने सांगितले की, ११९ यात्रेकरूंना सिमीकोटहून सुरखेत येथे सुरक्षित पोहोचवण्यात आले. या भागांत अडकलेल्या भारतीय नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी शक्य ते सर्व उपाय करण्यात येत आहेत. हिल्सा-सिमिकोट सेक्टरमध्ये यात्रेकरूंच्या सुटकेसाठी हेलिकॉप्टर्सची मदत घेण्यात येत असून, आतापर्यंत हेलिकॉप्टरच्या ३५ फेºया करण्यात आल्या व २०० जणांना सुरक्षितस्थळी नेण्यात आले.या कामासाठी चार्टर्ड हेलिकॉप्टरची सेवा घेण्याचाही विचार सुरू आहे. हवामानाची स्थिती कशी राहील, यावर पुढील निर्णय घेण्यात येणार आहे. काल १५८ यात्रेकरूंना सिमीकोटहून नेपालगंज येथे नेण्यात आले होते. नेपालगंज हे सुसज्ज असे शहर असून, तेथून रस्त्याच्या मार्गाने लखनौला तीन तासांत पोहोचता येते.दूतावासाने यात्रेकरू व त्यांच्या कुटुंबियांसाठी हॉटलाईन उपलब्ध करून दिली असून, त्यात तमिळ, तेलगू, कन्नड व मल्याळम भाषेतील कर्मचारी उपलब्ध आहेत. सिमीकोटमध्ये ५६ वर्षीय लीला नारायणन मंद्रीदथ (केरळ) व तिबेटमध्ये आंध्र प्रदेशच्या सत्या लक्ष्मी यांचा मृत्यू झाला. त्यांचे मृतदेह काठमांडू व नेपाळगंजमध्ये नेण्यात आले. (वृत्तसंस्था)संरक्षण मंत्रालय मदतीस तयारचेन्नई : नेपाळमध्ये अडकलेल्या भारतीय यात्रेकरूंच्या सुटकेसाठी सर्वतोपरी मदत करण्यास संरक्षण मंत्रालय तयार आहे, असे संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे. येथील विमानतळावर त्या म्हणाल्या की, यात्रेकरूंना लवकरात लवकर भारतात आणण्यासाठी विदेश मंत्रालय प्रयत्नशील आहे. संरक्षण मंत्रालयही गरज पडल्यास या कामी मदत करील.

टॅग्स :Nepalनेपाळ