एफआयआरमधून नाव रद्दजबलपूर : मध्य प्रदेशचे राज्यपाल रामनरेश यादव यांना मंगळवारी मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने मोठा दिलासा देत व्यावसायिक परीक्षा मंडळ (व्यापमं) घोटाळ्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध दाखल एफआयआर रद्द केला. राज्यघटनेत राष्ट्रपती आणि राज्यपाल यांना विशेष अधिकार प्राप्त आहेत आणि त्यांच्याविरुद्ध फौजदारी कारवाई करता येणार नाही, असे न्यायालयाने या वेळी स्पष्ट केले. मुख्य न्यायाधीश न्या. अजय खानविलकर आणि न्या. रोहित आर्या यांनी याप्रकरणी विशेष कृती दलाने राज्यपालांविरुद्ध दाखल एफआयआर रद्द करण्याचे आदेश दिले.
मध्य प्रदेशच्या राज्यपालांना दिलासा
By admin | Updated: May 6, 2015 03:42 IST