ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. २८ - राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना पेड न्यूज प्रकरणी निवडणूक आयोगाने बजावलेल्या कारणे दाखवा नोटीशीला दिल्ली उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने चव्हाण यांना दिलासा मिळाला आहे.
२००९ च्या विधानसभा निवडणूक खर्चाचा दिलेला हिशेब योग्य नसल्याने त्यांना अपात्र का घोषित करण्यात येऊ नये, अशी नोटीस निवडणूक आयोगाने बजावली होती. कायदेशीर सल्ला घेऊन या नोटीशीला २० दिवसात उत्तर द्यावे, असेही आयोगाने सांगितले होते. मात्र दिल्ली उच्च न्यायालयाने या नोटीशीला स्थगिती दिली असून चव्हाण यांच्याविरोधात तक्रार दाखल करणारे भाजप नेते मुख्तार अब्बास नक्वी, किरीट सोमय्या यांनाही न्यायालयाने नोटीस बजावली आहे.