शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

आधी ग्राहकांना भरपाई; नंतर द्या रेराच्या आदेशाला आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2021 06:36 IST

सर्वाेच्च न्यायालय : बांधकाम व्यावसायिकांना दणका

ठळक मुद्देसर्वाेच्च न्यायालयाने एका प्रकरणात यासंदर्भात निर्णय दिला आहे. प्राधिकरणाला दंडाची रक्कम ३० टक्क्यांहून अधिक वाढविण्याचे स्वातंत्र्यही देण्यात आले आहे

नवी दिल्ली : सर्वाेच्च न्यायालयाच्या एका निर्णयाने गृहखरेदी करणाऱ्या ग्राहकांना माेठा दिलासा मिळाला आहे. सरकारने रेरा कायद्याने घर खरेदी करणाऱ्यांना संरक्षण दिले आहे; मात्र ‘रेरा’ने दिलेल्या निर्णयाला आव्हान देऊन बिल्डरांकडून टाळाटाळ केली जाते. आता तसे करताना बिल्डरांना विचार करावा लागणार आहे. रेरा प्राधिकरणाच्या आदेशांना आव्हान देण्यापूर्वी बिल्डरांना नुकसानभरपाईची संपूर्ण रक्कम व्याजासह किंवा दंडाची किमान ३० टक्के रक्कम जमा करावी लागणार आहे. रिअल इस्टेट कायद्यातील या तरतुदीला सर्वोच्च न्यायालयाने उचलून धरले आहे.

सर्वाेच्च न्यायालयाने एका प्रकरणात यासंदर्भात निर्णय दिला आहे. प्राधिकरणाला दंडाची रक्कम ३० टक्क्यांहून अधिक वाढविण्याचे स्वातंत्र्यही देण्यात आले आहे. ‘रेरा’ने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्याऐवजी बिल्डर्स न्यायालयात आव्हान देऊन ग्राहकांना परतावा आणि नुकसानभरपाई देण्याचे टाळतात; मात्र न्या. यू. यू. लळीत यांच्या नेतृत्वातील खंडपीठाने यासंदर्भात निर्णय देऊन बिल्डरांना दणका दिला आहे. ‘रेरा’च्या आदेशांना न्यायालयात आव्हान देणे नित्याचे झाले आहे. हे प्रकार राेखण्यासाठी प्रवर्तकांनी नुकसानभरपाईची रक्कम जमा करण्याची अट याेग्य आणि कायद्याला धरून असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. घर खरेदी करणाऱ्यांचे हित जाेपासणे महत्त्वाचे असून दाव्यांची दखल घेतली जावी, हा या कायद्यातील अटीमागचा हेतू आहे, यामुळे आपल्या बाजूने निकाल लागलेल्या ग्राहकांना परतावा आणि नुकसानभरपाई लवकर मिळण्यास मदत हाेईल, अशी अपेक्षा ग्राहकांच्या संघटनेने व्यक्त केली आहे.

टॅग्स :delhiदिल्लीCourtन्यायालय