शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

१५ ते १८ वयोगटातील मुलांची आजपासून लसीसाठी नोंदणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2022 06:01 IST

Corona Vaccination : मुंबईत १६ जानेवारी २०२१ पासून लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली. आरोग्य सेवक, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्य देण्यात आले.

मुंबई : केंद्र सरकारच्या निर्देशानुसार १५ ते १८ वयोगटातील मुलांचे ३ जानेवारीपासून लसीकरण केले जाणार आहे. मुंबईतील नऊ ठिकाणी नऊ लाख मुलांना लस देण्यात येणार आहे. यासाठी १ जानेवारीपासून ऑनलाईन नाव नोंदणीला सुरुवात होणार आहे. केवळ कोव्हॅक्सिन लस दिली जाणार असल्याचेही पालिकेने स्पष्ट केले आहे.

मुंबईत १६ जानेवारी २०२१ पासून लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली. आरोग्य सेवक, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्य देण्यात आले. त्यानंतर १ मेपासून १८ वर्षांवरील सर्व नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. पालिका, शासकीय व खासगी अशी एकूण ४५१ लसीकरण केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.

आता १५ ते १८ वयोगटातील मुलांच्या लसीकरणाची मोहीम ३ जानेवारीपासून सुरू होणार आहे. त्यानुसार सध्या २००७ मध्ये किंवा त्यापूर्वी जन्म झालेल्या मुलांना लस घेता येणार आहे. १५ ते १८ वर्ष वयोगटातील लसीकरणाची सुरुवात जम्बो लसीकरण केंद्रामध्ये किंवा मोकळ्या रुग्णालयांमध्ये केली जाणार असल्याचे अतिरिक्त महापालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या