शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना लस घेण्यासाठी अशी करा नोंदणी; जाणून घ्या सारी प्रक्रिया...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2021 06:08 IST

Corona Vaccination : केंद्र सरकारने बुधवारी लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याची घोषणा केली. त्यानुसार ६० वर्षे वयावरील लोकांना १ मार्चपासून लस घेता येईल. तर ४५ वर्षे वयावरील परंतु ज्यांना शारीरिक व्याधी असतील अशांनाही लस घेता येणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्ककेंद्र सरकारने बुधवारी लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याची घोषणा केली. त्यानुसार ६० वर्षे वयावरील लोकांना १ मार्चपासून लस घेता येईल. तर ४५ वर्षे वयावरील परंतु ज्यांना शारीरिक व्याधी असतील अशांनाही लस घेता येणार आहे. लसीकरणासाठी ३० हजार केंद्रांची उभारणी केली जाणार असून त्यापैकी १० हजार केंद्रांत लस मोफत दिली जाणार आहे. खासगी आरोग्य केंद्रे व रुग्णालयांत लसीसीठी शुल्क आकारले जाणार आहे. परंतु लसीकरणासाठी नोंदणी कशी आणि कुठे करायची, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. पाहू या काय आहे ही प्रक्रिया...

लसीकरणासाठी काय करावे लागेल?लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात स्वनोंदणी पद्धत असेल लाभार्थ्याला को-विन ॲप २.० डाऊनलोड करावे लागेलया ॲपवरून लसीकरणासाठी नोंदणी करता येऊ शकेल

नोंदणीसाठी कोणकोणती कागदपत्रे?n आधार कार्डn मतदार ओळखपत्रवयाची खात्री झाली की मगच को-विन ॲपवर अन्य माहिती दिसू शकेल

मतदार ओळखपत्र जुने आहे?त्यात वय ५०पेक्षा कमी असल्याचे दर्शवत असेल तर काय करावे?n यासंदर्भातील निर्णय घेण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना असतील.n मतदारयादीतील तुमच्या नोंदणीनुसार तुमच्या वयाची पडताळणी केली जाईल.n जिल्हाधिकाऱ्यांनी पडताळणी केल्यानंतर वय अपडेट केले जाईल.

लसीकरणासाठी तारीख आणि वेळ यांची निश्चिती करण्याचे अधिकार असतील का?होय, को-विन ॲपवर तुम्ही अपलोड केलेला डेटा आणि वय हे सर्व जुळले की ॲपवर लसीकरण केंद्राची नावे आणि स्थळ पाहायला मिळेल.आपण कोणत्या स्थळी लस घ्यावी याची निवड लाभार्थ्याला करता येईल.कोणत्या तारखेला लस घ्यायची हे ठरविण्याचे अधिकारही लाभार्थ्याला. 

अन्य राज्यातील मतदार ओळखपत्र असेल तर काय?देशातील कोणत्याही राज्यात लस घेण्याचे स्वातंत्र्य सरकारने लाभार्थ्यांना दिले आहेमूळ उत्तर प्रदेशातील निवासी असलेला लाभार्थी महाराष्ट्रात लस घेऊ शकेल. 

‘इतर व्याधी असलेले लोक’ या श्रेणीत कोणाचा समावेश असेल?n यासंदर्भात अद्याप केंद्र सरकारकडून ठोस अशी घोषणा झालेली नाहीn परंतु ढोबळमानाने कर्करोग, किडनीचे विकार, हृदयविकार, मधुमेह आणि हायपरटेन्शन हे आजार असलेल्यांचा या श्रेणीत समावेश असेलसंकलन : विनय उपासनी, ग्राफिक्स : नागेश बैताडिया

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या