पान १/सलमानचा जामीन रद्द करण्यास नकार
By admin | Updated: August 31, 2015 21:30 IST
नवी दिल्ली: सर्वोच्च न्यायालयाने हिट ॲण्ड रनप्रकरणात चित्रपट अभिनेता सलमान खानला मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला जामीन रद्द करण्याची मागणी करणार्या याचिकेवर सुनावणीस सोमवारी नकार दिला.
पान १/सलमानचा जामीन रद्द करण्यास नकार
नवी दिल्ली: सर्वोच्च न्यायालयाने हिट ॲण्ड रनप्रकरणात चित्रपट अभिनेता सलमान खानला मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला जामीन रद्द करण्याची मागणी करणार्या याचिकेवर सुनावणीस सोमवारी नकार दिला.सरन्यायाधीश एच.एल. दत्तु आणि न्या. अमिताभ राय यांच्या पीठाने याचिकाकर्त्यास याचिका परत घेण्याची परवानगी दिली आहे.सुशीलाबाई हिंमतराव पाटील यांनी ॲड. मनोहरलाल शर्मा यांच्या मार्फत दाखल केलेल्या याचिकेत सलमानचा जामीन रद्द करण्यासोबतच कनिष्ठ न्यायालयाने त्याला ठोठावलेल्या पाच वर्षांच्या शिक्षेत वाढ करण्याची मागणीही केली होती. यापूर्वी २७ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणी दोषसिद्धी आणि शिक्षेविरुद्ध सलमानने केलेल्या याचिकेवरील सुनावणी मुंबई उच्च न्यायालयातून इतरत्र स्थलांतरित करण्याची मागणी करणारी पाटील यांची आणखी एक याचिका फेटाळली होती. (लोकमत न्यूज नेटवर्क)