शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानी दहशतवाद्याचा दयेचा अर्ज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी फेटाळला, फाशीची शिक्षा कायम

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2024 16:20 IST

Red Fort Attack Case: लाल किल्ला हल्ला प्रकरणात पाकिस्तानी दहशतवादी मोहम्मद आरिफ उर्फ ​​अशफाक दोषी

Pakistani Terrorist Death Penalty, President of India Draupadi Murmu: लाल किल्ला हल्ला प्रकरणात (Red Fort Attack Case) दोषी ठरलेला पाकिस्तानीदहशतवादी मोहम्मद आरिफ उर्फ ​​अशफाक याचा दयेचा अर्ज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज फेटाळला. सुमारे २४ वर्षे जुन्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने पाकिस्तानी दहशतवाद्याला दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावली होती. ३ नोव्हेंबर २०२२ रोजी सुप्रीम कोर्टाने मोहम्मद आरिफची पुनर्विचार याचिका फेटाळली आणि फाशीची शिक्षा कायम ठेवली. २५ जुलै २०२२ रोजी कार्यभार स्वीकारल्यानंतर राष्ट्रपतींनी फेटाळलेली ही दुसरी दयेची याचिका आहे. दरम्यान, घटनेच्या कलम ३२ अंतर्गत दीर्घ विलंबाच्या कारणास्तव शिक्षा कमी करण्यासाठी दोषी अद्याप सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकतो.

मोहम्मद आरिफ हा पाकिस्तानी नागरिक आहेच. त्यासोबतच प्रतिबंधित लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी आहे. लाल किल्ल्यावरील हल्ल्याच्या चार दिवसांनंतर दिल्ली पोलिसांनी त्याला अटक केली होती. राष्ट्रपतींच्या सचिवालयाच्या २९ मे रोजी च्या आदेशाचा हवाला देत अधिकाऱ्यांनी सांगितले की, १५ मे रोजी प्राप्त झालेला मोहम्मद आरिफचा दयेचा अर्ज २७ मे रोजी फेटाळण्यात आला. यापूर्वी सुप्रीम कोर्टाने फाशीची शिक्षा कायम ठेवत आरिफच्या बाजूने कोणतीही परिस्थिती नसल्याचे सांगितले होते. लाल किल्ल्यावरील हल्ला हा देशाची एकता, अखंडता आणि सार्वभौमत्वाला थेट धोका असल्याचे न्यायालयाने स्पष्टपणे म्हटले होते. २२ डिसेंबर २००० रोजी दहशतवाद्यांनी लाल किल्ला संकुलात तैनात राजपुताना रायफल्सच्या ७ तुकड्यांवर गोळीबार केला. त्यामुळे तेथे तैनात असलेल्या तीन लष्करी जवानांचा मृत्यू झाला होता.

सर्वोच्च न्यायालयाने २०२२ मध्ये या संदर्भात त्याला शिक्षा सुनावली. सुप्रीम कोर्टाने म्हटले होते की, आरोपी मोहम्मद आरिफ उर्फ ​​अशफाक हा पाकिस्तानी नागरिक होता आणि त्याने भारतीय हद्दीत बेकायदेशीरपणे प्रवेश केला होता. तो इतर दहशतवाद्यांच्या सहकार्याने हा हल्ला घडवून आणण्याबद्दल दोषी आढळला आहे. यापूर्वी ट्रायल कोर्टाने ऑक्टोबर २००५ मध्ये त्याला फाशीची शिक्षा सुनावली होती. दिल्ली उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने त्यानंतरच्या अपीलांमध्ये हा निर्णय कायम ठेवला. त्यानंतर त्याने राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज केला. मात्र दया याचिका फेटाळून राष्ट्रपती मुर्मू यांनी त्याची फाशीची शिक्षा कायम ठेवली.

टॅग्स :Presidentराष्ट्राध्यक्षDraupadi Murmuद्रौपदी मुर्मूPakistanपाकिस्तानterroristदहशतवादी