चोरीतील आरोपीकडून ४६ हजारांचा मुद्देमाल हस्तगत
By admin | Updated: February 14, 2015 23:51 IST
अकोला - जुने शहरातील हमजा प्लॉट, गंगानगरसह विविध ठिकाणी चोरी करणार्या अल चोरट्याकडून जुने शहर पोलिसांनी सुमारे ४६ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. हमजा प्लॉट येथील रहिवासी इक्बाल ऊर्फ सोनू युनुस पठाण याला गंगानगर परिसरात केलेल्या चोरीप्रकरणी जुने शहर पोलिसांनी अटक केली होती. पोलीस कोठडीमध्ये असताना त्याने हमजा प्लॉट येथील चोरी प्रकरणाची कबुली दिली असून, त्याच्याकडून रोख व सोन्या-चांदीचे दागिने, असा एकूण ४६ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. हा आरोपी जुने शहर पोलीस स्टेशनमधील पोलीस कर्मचारी राजू वानखडे यांच्या पोलिस कोठडीत असून, त्याला अटक करण्यासाठी पंकज उपाध्याय, संजय पांडे व दादाराव टापरे यांनी केली.