ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. १७ - पाकिस्तानच्या कुरापती अद्याप सुरूच असून पाकिस्तानने पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन करत पूँछ सेक्टरमध्ये गोळीबार केला आहे. गुरूवारी रात्री व शुक्रवारी सकाळी दोनवेळा पाकिस्तानकडून भारतीय चौक्यांच्या दिशेने गोळीबार करण्यात आला असून भारतीय जवानांनीही त्यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. सुदैवाने यात कोणीही जखमी झालेले नाही.
गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानच्या भारताविरोधातील कारवायांत वाढ झाली असून सीमेवरील गावांत झालेल्या गोळीबारानंतर सुमारे ३० हजार नागरिकांनी गाव सोडून स्थलांतर केले आहे.