शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

Raj Thackeray: ‘असली आ रहा है, नकली से सावधान’;शिवसेना-मनसेचा वाद पोहोचला अयोध्येत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2022 05:33 IST

भाजप खासदाराचीही राज यांच्याविरुद्ध बॅनरबाजी. बॅनरवर शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यापूर्वी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे अयोध्येत जाणार असतानाच आता शिवसेनेकडून ‘असली आ रहा है, नकली से सावधान’ असे बॅनर अयोध्येत फडकविण्यात आले आहेत. यानिमित्ताने शिवसेना - मनसेमधील वाद हा थेट अयोध्येत पोहोचला आहे. 

बॅनरवर शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो आहेत. राज यांनी सध्या हिंदुत्वाचा अजेंडा हाती घेतला आहे. दोन पक्षांमध्ये हिंदुत्वावरून आरोप-प्रत्यारोप होत आहेत. राज यांची हिंदुत्वाची भूमिका नकली असल्याचे शिवसेनेने या बॅनरमधून सूचित केले.

आदित्य यांच्या अयोध्या दौऱ्याची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. मात्र राज यांच्या पूर्वी ते अयोध्येला धडकणार आहेत. भाजपच्या स्थानिक नेत्यांकडून राज यांच्या माफीनाम्याचे मागणी केली जात असताना आता शिवसेनेने राज यांच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

माफी मागण्यावरून वाद उफाळलामनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांची माफी मागितली नाही तर त्यांना अयोध्येत येऊ देणार नाही, असा इशारा भाजपचे खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी दिला असतानाच आता याच मागणीचे बॅनर अयोध्येत जागोजागी झळकले आहेत. राज हे ५ जून रोजी अयोध्येला जाणार आहेत. खा. ब्रिजभूषण सिंह यांनी राज यांना इशारा दिलेला होता, पण उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांना फोन करून समजावले असून, आता ते शांत झाले आहेत, असा दावा मनसेचे नेते अभिजीत पानसे यांनी दोन दिवसांपूर्वी केला.

राज यांना अयोध्येत येण्यापासून रोखणारब्रिजभूषण सिंह यांच्या समर्थकांनी आता राज यांच्याविरोधात अयोध्येत बॅनर युद्ध छेडले आहे. खा. सिंह यांनी ५ जूनला ‘चलो अयोध्या’ अशी हाक दिली आहे. त्यादिवशी राज यांना अयोध्येत येण्यापासून रोखले जाईल, असेही त्यांनी बजावले आहे. राज हे उत्तर भारतीयांची हात जोडून माफी मागत नाहीत, तोवर योगी आदित्यनाथ यांनी त्यांना भेटू नये. ठाकरे कुटुंबाचा राम मंदिर आंदोलनाशी काडीचाही संबंध नव्हता. रा. स्व. संघ आणि विश्व हिंदू परिषदेचेच योगदान आंदोलनात होते, असे ब्रिजभूषण सिंह यांनी समाजमाध्यमात म्हटले आहे.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेShiv SenaशिवसेनाAyodhyaअयोध्या