शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

‘माझ्यावरील हल्ल्यामागील खरे गुन्हेगार द्वेष पसरविणारे’

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2018 04:49 IST

माझ्यावर झालेल्या हल्ल्यामागील खरे गुन्हेगार द्वेषाचे, रक्ताची तहान लागलेले व भीती निर्माण करणारेच आहेत, असे जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी नेते उमर खालिद यांनी मंगळवारी म्हटले.

नवी दिल्ली : माझ्यावर झालेल्या हल्ल्यामागील खरे गुन्हेगार द्वेषाचे, रक्ताची तहान लागलेले व भीती निर्माण करणारेच आहेत, असे जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी नेते उमर खालिद यांनी मंगळवारी म्हटले. खालिद यांच्यावर सोमवारी हल्ला झाला होता.खालिद यांनी फेसबुकवरील पोस्टमध्ये भाजपाच्या प्रवक्त्यांवर आणि प्रसारमाध्यमांवर ठपका ठेवला. खालिद म्हणाले की, या लोकांनी (प्रवक्ते व मीडिया) मला ‘तुकडे तुकडे गँग’चा भाग बनवून टाकले. खालिद यांनी फेसबुकवर ते पत्रकार गौरी लंकेश यांच्यासोबत असल्याचे छायाचित्रही टाकले आहे. लंकेश यांची सप्टेंबर, २०१७ मध्ये हत्या झाली. मला सतत येत असलेल्या धमक्या व गेल्या काही वर्षांत कार्यकर्त्यांच्या झालेल्या हत्या पाहता, एखाद्या दिवशी माझ्यावरही बंदूक रोखली जाईल, हे मला माहिती आहे, असे त्यांनी लिहिले. नरेंद्र दाभोळकर, एम. एम. कलबुर्गी, गोविंद पानसरे, गौरी लंकेश अशी हत्या झालेल्यांची यादी वाढतच आहे. खालिद म्हणाले की, माझ्यावरील हल्ला हा देशाच्या राजधानीत अत्यंत कडक सुरक्षा असलेल्या भागात तोही स्वातंत्र्य दिन दोन दिवसांवर आलेला असताना झालेला आहे. यावरून काही लोकांना सध्याच्या राजवटीत काहीही केले, तरी कशी मोकळीक मिळते हे सिद्ध झाले आहे. माझ्यावरील हल्लेखोर कोण होते, हे मला माहिती नाही, परंतु ते खरेखुरे गुन्हेगार नाहीत, असे ते म्हणाले. (वृत्तसंस्था)

टॅग्स :delhiदिल्लीnewsबातम्या