शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

सन्मान, प्रतिष्ठा राखण्यास सीमा ओलांडण्याची तयारी : संरक्षणमंत्री राजनाथ सिंह

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2023 05:17 IST

नागरिकांना लष्कराला पाठिंबा देण्यासाठी तयार राहण्याचे आवाहन

द्रास (लडाख) : भारत आपला सन्मान आणि प्रतिष्ठा राखण्यासाठी नियंत्रण रेषा (एलओसी) ओलांडण्यास तयार आहे, अशी गर्जना करत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सामान्य नागरिकांनी अशा स्थितीत सैनिकांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी सज्ज राहावे,’ असे आवाहन केले. रशिया-युक्रेन युद्धाचे उदाहरण देत राजनाथ सिंह म्हणाले की, हे युद्ध एका वर्षाहून अधिक काळ सुरू आहे, कारण नागरिक पुढे आले आहेत आणि युद्धात भाग घेत आहेत. 

२४ व्या कारगिल विजय दिनानिमित्त येथील युद्ध स्मारकात सिंह बोलत होते. तत्पूर्वी, त्यांनी १९९९ च्या कारगिल युद्धात प्राणांची आहुती देणाऱ्या सैनिकांना स्मृतिस्थळावर पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. 

राजनाथ सिंग यावेळी म्हणाले की, देशाचा सन्मान आणि प्रतिष्ठा राखण्यासाठी आम्ही कोणत्याही थराला जाऊ शकतो. याचा अर्थ नियंत्रण रेषा ओलांडणे असेल तर आम्ही ते करण्यासही तयार आहोत. आम्हाला चिथावणी दिली गेली आणि गरज पडल्यास आम्ही नियंत्रण रेषा ओलांडू. जेव्हा जेव्हा युद्धाची परिस्थिती असते तेव्हा आमच्या लोकांनी नेहमीच आमच्या जवानांना पाठिंबा दिला आहे. 

या युद्धात लढलेल्या अनेकांचे नुकतेच लग्न झाले होते, काहींचे लग्न   होणार होते  किंवा काही त्यांच्या कुटुंबाचे एकमेव कमावते होते. मात्र, त्यांनी आपल्या प्राणाची पर्वा न करता देशासाठी बलिदान दिले. त्यांचे बलिदान व्यर्थ गेले नाही, त्यांचे योगदान पुढील पिढ्यांना प्रेरणा देत राहील, असेही सिंग यावेळी म्हणाले. (वृत्तसंस्था) 

कारगिल युद्ध भारतावर लादण्यात आले होते. ज्या वेळी भारत पाकिस्तानसोबतचे प्रश्न चर्चेने सोडवण्याचा प्रयत्न करत होता, त्या वेळी पाकिस्तानने आमच्या पाठीत खंजिर खुपसला.    - राजनाथ सिंह, संरक्षणमंत्री

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंह