शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

अनेक महिने ठाण मांडण्यासाठी सज्ज, गावागावांतून मदतीचे हात पुढे; नाही धनधान्याची कमतरता

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2020 02:29 IST

स्थानिकांकडूनही रसद; पंजाबमधील गावांमध्ये शेतकऱ्यांकडून दर एकरामागे १५० रुपये व प्रत्येक बिघामागे ४० रुपये आंदोलनासाठी निधी म्हणून गोळा करण्यात आले.

नवी दिल्ली : नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीनजीकच्या तिक्री सीमेवर ठाण मांडून बसलेले शेतकरी अनेक महिने आंदोलन करण्याच्या तयारीनेच तिथे आले आहेत. या आंदोलकांना धन, तसेच धान्याची कधीही कमतरता जाणवणार नाही अशी तेथील परिस्थिती आहे.  

आंदोलकांपैकी बहुतांश शेतकरी पंजाबमधील आहेत. नव्या कृषी कायद्यांविरोधातील आंदोलनासाठी या शेतकऱ्यांनी आपापल्या गावांतून निव्वळ मोठ्या प्रमाणावर निधीच नव्हे, तर अन्नधान्यासहित इतर वस्तूही गोळा केल्या आहेत. त्यामध्ये तांदूळ, साखर, पेट्रोल, डिझेल आदी गोष्टींचा समावेश आहे. या आंदोलकांना स्थानिक नागरिकांकडून भाजीपाला, फळे, दूध, पाणी, लाडू, हलवा, जिलेबी, लस्सी, मिठाई अशा अनेक गोष्टी पुरविण्यात येतात. त्याच गोष्टी सध्या आंदोलक वापरत असून, त्यांनी आपल्याकडील अन्नधान्य साठा पुढच्या काळासाठी जपून ठेवला आहे. हे आंदोलन लांबल्यास या गोष्टी कामाला येतील असा त्यामागे विचार आहे.

नव्या कृषी कायद्याच्या विरोधातील आंदोलनासाठी हवा तितका निधी देण्याची तयारीही शेतकऱ्यांनी दाखविली आहे. त्यामुळे पैसा अपुरा पडण्याचा मुद्दाच उपस्थित होत नाही असेही हा आंदोलक म्हणाला.  

असा गोळा केला निधीपंजाबमधील गावांमध्ये शेतकऱ्यांकडून दर एकरामागे १५० रुपये व प्रत्येक बिघामागे ४० रुपये आंदोलनासाठी निधी म्हणून गोळा करण्यात आले. या पैशातून आंदोलक शेतकऱ्यांनी ३ लाख रुपयांचे डिझेल विकत घेतले असल्याची माहिती एका आंदोलकाने दिली.

दीर्घ लढा : अल्प-भूधारकही रस्त्यावर 

केंद्रीय कृषी कायद्याविरोधात बांधावरून रस्त्यावर आलेल्या शेतकऱ्यांनी दीर्घ लढ्याची तयारी केली आहे. बळीराजाला मदतीसाठी असंख्य अदृश्य हात पुढे आले आहेत. त्यात स्थानिक लोक आहेत. पंजाबमधील शेतकरी या लढ्याचे केंद्र असून, तिकरी गावाच्या सीमेवर त्यांनी ठाण मांडले आहे.  शेतकरी आंदोलनामुळे केंद्र सरकारमध्येही अस्वस्थता आहे. कोरोना, रात्री उघड्यावर थंडीची पर्वा न करता शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. काही शेतकऱ्यांनी तर स्वतःकडे असलेल्या एकूण जमिनीचा एकरी भाव लावून आंदोलकांना मदत केली. दीडशे रुपये प्रतिएकर या पटीत शेतकरी मदत करीत आहेत. 

नोव्हेंबरपासून घर सोडल्याचे नमूद करून तेथील गुरलाल सिंह म्हणाले, आंदोलनाच्या पहिल्या दिवसापासून आम्हाला लोकांनी मुक्तहस्ते मदत केली. गाव सोडताना आमच्याकडे तीन लाख रुपये गोळा झाले होते. एका जमीन मालकाने त्याच्याकडे असलेल्या जमिनीसाठी एकरामागे दीडशे रुपये मदत दिली. शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे केंद्र सरकार हादरले आहे. दररोज  केंद्रीय प्रतिनिधी शेतकऱ्यांशी चर्चा करतात. शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळासमवेतही चर्चा सुरू आहे. 

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संप