(वाचली) झेवियर्स, पाटणे, आयर्विन व बावडेकर उपांत्य फेरीत शालेय क्रिकेट स्पर्धा
By admin | Updated: October 1, 2014 00:06 IST
कोल्हापूर : जिल्हा क्रीडा कार्यालय व कोल्हापूर महापालिका यांच्यावतीने घेण्यात आलेल्या चौदा वर्षांखालील शालेय क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्यपूर्व सामन्यात सेंट झेविअर्स स्कूल, तवनाप्पा पाटणे, आयर्विन ख्रिश्चन, माईसाहेब बावडेकर स्कूलने उपांत्य फेरीत प्रवेश केला.
(वाचली) झेवियर्स, पाटणे, आयर्विन व बावडेकर उपांत्य फेरीत शालेय क्रिकेट स्पर्धा
कोल्हापूर : जिल्हा क्रीडा कार्यालय व कोल्हापूर महापालिका यांच्यावतीने घेण्यात आलेल्या चौदा वर्षांखालील शालेय क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्यपूर्व सामन्यात सेंट झेविअर्स स्कूल, तवनाप्पा पाटणे, आयर्विन ख्रिश्चन, माईसाहेब बावडेकर स्कूलने उपांत्य फेरीत प्रवेश केला. आज, मंगळवारी शिवाजी स्टेडियम येथे झालेल्या सामन्यात सेंट झेवियर्स स्कूलने महावीर इंग्लिश मीडियम स्कूलवर ९ विकेटनी विजय मिळविला. तवनाप्पा पाटणे हायस्कूलने पोतदार इंटरनॅशनल स्कूलवर ९१ धावांनी विजय मिळविला. आयर्विन ख्रिश्चन हायस्कूलने शांतिनिकेतन स्कूलवर १२ धावांनी तर माईसाहेब बावडेकरने कोल्हापूर पब्लिक स्कूलवर १६ धावांनी विजय मिळविला. (प्रतिनिधी)