शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

मध्यमवर्गीयांपर्यंत पोहोचा, योजनांचे फायदे सांगा..., पंतप्रधान मोदींचा मंत्र्यांना कानमंत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2023 12:36 IST

Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केंद्रीय मंत्र्यांना मध्यमवर्गीयांना ज्या योजनांचा फायदा झाला त्या योजनांचा तपशील त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचे आवाहन केल्याचे सूत्रांनी सांगितले.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केंद्रीय मंत्र्यांना मध्यमवर्गीयांना ज्या योजनांचा फायदा झाला त्या योजनांचा तपशील त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचे आवाहन केल्याचे सूत्रांनी सांगितले. १ फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवताना त्यांनी हा कानमंत्र दिला.

बैठकीत मोदी म्हणाले की, सरकारी योजनांचा गरीब आणि उपेक्षितांना फायदा झाला आहे, तर मध्यमवर्गीयांसाठीही अनेक उपक्रम हाती घेण्यात आले आहेत, ज्यामुळे त्यांचे जीवनमान उंचावले आहे. केंद्रीय मंत्र्यांनी त्यांना विविध मार्गांनी मदत करणाऱ्या उपक्रमांचा तपशील मध्यमवर्गांपर्यंत पोहोचवताना वस्तुस्थिती मांडावी. भारताला  स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण होत असल्याने ब्रिटिश राजवटीची आठवण करून देणाऱ्या गोष्टी आणि कायदे रद्द करावे.केंद्र सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी बैठकीतील सादरीकरणाच्या प्रती मंत्र्यांना  देण्यात आल्या. २०२३ मध्ये झालेली केंद्रीय मंत्री परिषदेची ही पहिली बैठक होती. कॅबिनेट सचिव राजीव गाबा यांनी मोदी सरकारने गेल्या आठ वर्षांत सामाजिक आणि आर्थिक क्षेत्राशी संबंधित केलेल्या एकूण कामांवर तीन सादरीकरण सादर केली. 

मंत्रिमंडळ बैठकीतील सादरीकरणातील मुद्देभारताच्या दूरवरच्या भागात अनेक आयआयटी, आयआयएम आणि आयआयएस उघडण्यात आले आहेत.प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च शिक्षणाच्या सर्व स्तरांवर विद्यार्थ्यांची संख्या वाढली आणि शिक्षण सोडणाऱ्यांचे प्रमाण कमी झाले.सरकारी शाळांच्या पायाभूत सुविधांमध्ये मानवी आणि इतर संसाधनांचा कायापालट झाला आहे.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापरउद्योग संवर्धन विभाग आणि अंतर्गत व्यापार सचिव अनुराग जैन यांनी सरकारने सुरू केलेल्या विविध प्रकल्पांच्या स्थितीचे सादरीकरण केले. मोदी सरकारने केलेल्या चांगल्या कामाचा संदेश देण्यासाठी विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर कसा केला जाऊ शकतो हे माहिती आणि प्रसारण सचिव अपूर्व चंद्रा यांनी सांगितले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीCentral Governmentकेंद्र सरकार