शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

४0% नोटा ग्रामीण भागात पोहोचवा - आरबीआय

By admin | Updated: January 4, 2017 00:15 IST

नोटाबंदीमुळे गरीब आणि दुर्बल शेतकऱ्यांना भेडसावत असलेली रोखीची समस्या पाहून रिझर्व्ह बँकेने व्यावसायिक बँकांना ४0 टक्के नोटा ग्रामीण भागात पोहोचविण्याचे निर्देश दिले आहेत.

मुंबई : नोटाबंदीमुळे गरीब आणि दुर्बल शेतकऱ्यांना भेडसावत असलेली रोखीची समस्या पाहून रिझर्व्ह बँकेने व्यावसायिक बँकांना ४0 टक्के नोटा ग्रामीण भागात पोहोचविण्याचे निर्देश दिले आहेत. नोटाबंदीची ५0 दिवसांची मुदत संपली असली तरी अनेक क्षेत्रांत परिस्थिती गंभीर आहे. त्यामुळे सरकारने दररोजच्या पैसे काढण्यावर घातलेली २४ हजारांची मर्यादा उठविलेली नाही. ग्रामीण भागातील स्थिती आणखी वाईट आहे. ग्रामीण भागातील नोटांचा पुरवठा गरजेनुसार होताना दिसून येत नाही, असे रिझर्व्ह बँकेच्या निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेने एक अधिसूचना जारी करून बँकांसाठी निर्देश दिले आहेत. रिझर्व्ह बँकेने म्हटले की, या पार्श्वभूमीवर आवश्यक पावले आधीच उचलण्यात आली आहेत. बँकांनी आपल्याला मिळालेल्या नोटा क्षेत्रीय ग्रामीण बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, वाणिज्य बँकांच्या ग्रामीण शाखा, व्हाइट लेबल एटीएम आणि टपाल कार्यालये यांना योग्य प्रमाणात वितरीत कराव्यात. हे काम प्राधान्याने व्हायला हवे. कारण ग्रामीण क्षेत्रांत रोख वितरणाचे मुख्य वाहिन्या आहेत. ८ नोव्हेंबर रोजी मोदी यांनी पाचशे आणि हजारांच्या नोटा चलनातून बाद केल्याची घोषणा केली होती. नोटा बदलून घेण्यासाठी नागरिकांना ३0 डिसेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली होती. (वाणिज्य प्रतिनिधी)- ३१ डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राला उद्देशून भाषण केल्यानंतर रिझर्व्ह बँकेने हे निर्देश जारी केले आहेत. आपल्या भाषणात मोदी यांनी ग्रामीण भागातील रोख रकमेची समस्या तातडीने दूर करण्यास सांगितले होते. - रिझर्व्ह बँकेने सर्व राज्यांतील प्रत्येक जिल्ह्याचा आढावा घेतला आहे. त्यांच्या गरजेची माहितीही घेतली आहे. त्यानुसार प्रत्येक जिल्ह्याला आपल्या गरजेप्रमाणे नोटा वितरीत करण्यात आल्या आहेत.