शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलवरून येतो आणि मग पाकिस्तान-अफगाणिस्तान युद्धाकडे बघतो...; ट्रम्प म्हणतात, मी यात मास्टर...
2
Ambadas Danve : "योजना बंद करणारं 'चालू' सरकार"; अंबादास दानवेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, दाखवली यादी
3
रेनो क्विड इलेक्ट्रिक कार लाँच झाली, २५० किमीपर्यंतची रेंज, अन् अडास...; भारतात येताच टाटा टियागो EV ला जबरदस्त टक्कर देणार
4
"युद्ध थांबवा, नाहीतर युक्रेनला टॉमहॉक मिसाईल देईन"; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतीन यांना थेट इशारा
5
मुक्काम पोस्ट महामुंबई : धनुष्यबाण कोणाचा? याचा निकाल भाजपला महाराष्ट्रात नेमके काय हवे आहे, हे सांगणारा असेल
6
१००% पैसे होणार डबल! पोस्टाच्या ‘या’ स्कीममध्ये ₹२५,००० ची गुंतवणूक देईल लाखोंचा रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
7
"माझ्या मुलीला प्रचंड वेदना होताहेत...", वडिलांचा टाहो; पीडितेची प्रकृती गंभीर, मित्रावर संशय
8
सोने-चांदीच्या भावात बुलेट ट्रेनच्या वेगाने वाढ; महाराष्ट्रातील सराफा व्यापारी म्हणतात, आणखी वाढणार....
9
दुर्गापूर सामूहिक बलात्कार प्रकरण: "माझ्या म्हणण्याचा विपर्यास करण्यात आला, चुकीचा अर्थ काढला गेला", 'त्या' विधानावर ममतांचं स्पष्टिकरण
10
आजचे राशीभविष्य १३ ऑक्टोबर २०२५ : वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस धनलाभाचा, पण इतर राशींना...
11
मराठी अभिनेत्रीचा थाटात पार पडला लग्नसोहळा, नवऱ्याचं हास्यजत्रेशी आहे खास कनेक्शन!
12
बिहारमध्ये एनडीएचे ठरले; भाजप-जदयूला समान जागा, 'लोजपा'ला २९ तर 'रालोमो'ला ६ जागा
13
व्हॉट्‌सॲपची ‘ऑटो डाऊनलोड’ सेटिंग पडली महागात; क्षणात पावणेपाच लाख झाले गायब
14
‘आयटीआर’मधील चलाखी; गुरुजी ‘आयकर’च्या रडारवर
15
राज ठाकरे सहकुटुंब पोहचले मातोश्रीवर; चर्चा राजकीय? निमित्त स्नेहभोजनाचे, तीन महिन्यात दोघांची सातवी भेट 
16
सरकारी नोकरीच्या नावाखाली बेरोजगारांना १० कोटींचा गंडा, अकोल्यातील महाठगाच्या दिल्लीत आवळल्या मुसक्या
17
भारताच्या सरन्यायाधीशांच्या अवमानाचा प्रयत्न निंदनीय, अपमानाच्या अपराधावर काही गंभीर प्रश्न...
18
मुंबई महापालिकेत सध्याचे आरक्षित प्रभाग बदलणार; चक्राकार पद्धतीने सोडत; इच्छुकांना संधीची आशा
19
अत्यंत लाजिरवाणी घटना, भारताच्या भूमीत हे घडावे...?
20
अखेर महिला पत्रकारांना अफगाणिस्तानचे निमंत्रण

३० लाख कर्मचाऱ्यांना पुन्हा प्रशिक्षण; स्वातंत्र्यानंतर सर्वात मोठा पुढाकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2021 06:43 IST

आयोगाचे प्रमुखपद अदिल झैनुलभाई यांच्याकडे

- हरीश गुप्ता नवी दिल्ली : सरकारी सेवेतील ३० लाख कर्मचारी कल्पक, जबाबदार आणि तंत्रज्ञान कुशल व्हावेत, अशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची इच्छा असून, यापूर्वी त्यांनी अनेक प्रसंगी या कर्मचाऱ्यांची त्यांच्या चुकांबद्दल खरडपट्टी काढलेली आहे.देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सर्व पातळ्यांवर या कर्मचाऱ्यांच्या कौशल्यांत व कामकाजात सुधारणा व्हावी, यासाठीचे हे फेररचनेचे मोठे पाऊल आहे. मोदी यांनी यासाठी तीन सदस्यांच्या उच्चाधिकार आयोगाची म्हणजेच कॅपॅसिटी बिल्डिंग कमिशनची (सीबीसी) स्थापनाही केलेली आहे. त्याचे प्रमुखपद खासगी क्षेत्रातील अदिल झैनुलभाई यांच्याकडे दिले आहे. झैनुलभाई हे क्वालिटी कॉन्सिल ऑफ इंडियाचे (क्यूसीआय) माजी प्रमुख आहेत. अदिल हे आयआयटीच्या (मुंबई) १९७७ च्या तुकडीचे असून, त्यांनी हारवर्ड बिझिनेस स्कूलमधून (एचबीएस) पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ते सध्या एचबीएसच्या माजी विद्यार्थ्यांच्या भारतातील संघटनेचे अध्यक्ष आहेत.  मोदी यांनी पब्लिक एंटरप्रायजेस सिलेक्शन बोर्डचे अध्यक्षपद आधीच खासगी कंपनीतील महिलेकडे दिले आहे. हा बाेर्ड देशातील सरकारी मालकीच्या कंपन्यांसाठी अत्यंत वरिष्ठ अधिकारी नियुक्त करतो.सरकारी कर्मचाऱ्यांना अधिक जबाबदार, कल्पक, पुढाकार घेणारे, व्यावसायिक वृत्तीचे आणि तंत्रज्ञान कुशल बनविण्यासाठी मोदी खूप उत्सुक आहेत. ठरावीक चौकटीत राहून काम करण्याची संस्कृती नष्ट करून पारदर्शकता असली पाहिजे, यावर मोदी यांनी वारंवार भर दिलाआहे.सीबीसी केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या स्तरांवर काम करीत असलेल्या ३० लाख  कर्मचाऱ्यांच्या कामकाजाचा दर्जा सुधारावा, यासाठी सर्व सरकारी कार्यालये आणि प्रशिक्षण संस्थांवर लक्ष ठेवून समन्वय राखील.इतर सदस्यांत बालासुब्रमणियम आणि परदेशीआयोगाचे इतर दोन सदस्य रामास्वामी बालासुब्रमणियम आणि प्रवीण परदेशी (प्रशासन) आहेत. नरेंद्र मोदी हे इतर अनेक विभागांच्या कामकाजात एकात्मता आणत आहेत. निवृत्ती वेतन आणि प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रारी विभागाची जबाबदारी कार्मिक सचिव दीपक खांडेकर यांच्याकडे दिली गेली आहे.खांडेकर हे मध्य प्रदेश केडरचे भारतीय प्रशासन सेवेच्या १९८५च्या तुकडीचे अधिकारी आहेत. खांडेकर सांख्यिकी आणि कार्यक्रमअंमलबजावणी मंत्रालयात सचिवपदही भूषवतील.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी