शहरं
Join us  
Trending Stories
1
सौदी अरेबियाने पाकिस्तानच्या अणुशास्त्रज्ञाला वाचविले; सीआयएच्या माजी अधिकाऱ्याचे सनसनाटी गौप्यस्फोट 
2
महागठबंधन नव्हे महालठबंधन, NDA मोडणार सर्व विक्रम; PM मोदींनी फुंकले प्रचाराचे रणशिंग
3
आजचे राशीभविष्य २५ ऑक्टोबर २०२५ : आठ राशींसाठी आजचा दिवस चांगला, इतर...
4
५ दिवस पुन्हा अवकाळी; उत्तर विदर्भ वगळता राज्यभर बरसणार पावसाच्या सरी, ‘या’ ठिकाणी यलो अलर्ट
5
“...आता राज्यात ‘नैसर्गिक शेती मिशन’ राबविणार”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
6
देवाकडून मार्गदर्शन मागणे म्हणजे फसवणूक नाही; राम मंदिरचा निर्णय अवैध ठरवायची याचिका फेटाळली
7
भारत व्यापार करार दबावाखाली करत नाही; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी अमेरिकेला ठणकावले
8
लोकपाल सदस्यांना बीएमडब्ल्यू देण्यावरून राजकारण तापले; आता स्वदेशी चळवळीचे काय झाले?
9
कोणत्याही शत्रूला कमी न लेखता लष्करी जवानांनी सदैव सतर्क राहावे: संरक्षण मंत्री राजनाथसिंह
10
“तेजस्वी मुख्यमंत्री म्हणजे बिहारचे लोक मुख्यमंत्री”; पहिल्या दिवसापासूनच प्रचार धडाका
11
“राजदचा लाजिरवाणा पराभव झाल्यानंतर बिहारमध्ये खऱ्या अर्थाने दिवाळी”: अमित शाह
12
बिहार निवडणूक २०२५: दुसऱ्या टप्प्यात १२२ जागा, १३०२ जण रिंगणात; १३७२ उमेदवारांचे अर्ज वैध
13
भारतीय कंपन्या रशियन तेलाची खरेदी घटवणार; अमेरिकेकडून वाढवणार, तज्ज्ञांची माहिती
14
भारतातून ३०० कोटींच्या शेणाची निर्यात; आंतरराष्ट्रीय बाजारात गायीच्या शेणाला मागणी
15
अमेरिकन कामगारांवर अन्याय, एच-१बी व्हिसा शुल्क विरुद्धचे खटले लढू; ट्रम्प प्रशासनाचा निर्धार
16
२५० कोटी व्याजासह जमा करा तरच म्हणणे ऐकू! मुंबई मेट्रोची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
17
झुबीनचा मृत्यू कशामुळे? सिंगापूर पोलिस देणार पुरावे, CCTV फुटेज अन् जबाब दहा दिवसांत मिळणार
18
वायुप्रदूषणामुळे भारतात २०२३ मध्ये झाले २० लाख मृत्यू, संशोधन अहवालातील माहिती
19
इस्लामाबाद पोलीस एसपी होते भारताचे गुप्तहेर?; रहस्यमय मृत्यूनंतर सोशल मीडियात चर्चेला उधाण
20
२००२ मध्ये भारत-पाक युद्ध होणार होते?; माजी CIA एजेंटचा मुशर्रफ यांच्याबद्दल धक्कादायक खुलासा

Bengaluru stampede: बंगळुरू चेंगराचेंगरीत आरसीबीच्या चाहत्यांचा मृत्यू, पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 20:55 IST

PM Modi On Bengaluru stampede एम चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरी आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, ३३ जण जखमी झाले आहेत.

बंगळुरूतील एम चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरी आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, ३३ जण जखमी झाले आहेत. जखमींना बंगळुरूमधील वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. या दुःखद घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शोक व्यक्त केला आहे.

पंतप्रधान मोदींनी अधिकृत एक्स हँडलवर लिहिले की, "बंगळुरूमधील ही दुर्घटना अत्यंत हृदयद्रावक आहे. या दुःखद क्षणी, ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे, त्यांच्यासोबत माझ्या संवेदना आहेत. सर्व जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत, अशी प्रार्थना करतो."

दरम्यान, १८ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने पहिल्यांदाच आयपीएलचे विजेतेपद जिंकण्यात यश मिळवले. त्यामुळे आरसीबीने हा ऐतिहासिक विजय घरच्या मैदानावर बंगळुरूत साजरा करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आरसीबीचा संघ आज दुपारी अहमदाबादहून बंगळुरूत दाखल झाला. 

आरसीबी संघ बंगळुरूला पोहोचला, तेव्हा सर्वप्रथम मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी विधानसभेत गेला. येथे सर्व खेळाडूंचा सन्मान करण्यात आला. विधानसभेबाहेर हजारो चाहते जमले होते. आपल्या आवडत्या संघाला पाहण्यासाठी आरसीबीच्या चाहत्यांनी बंगळुरू विमानतळापासून हॉटेलपर्यंत आणि कर्नाटक विधान सौधाच्या बाहेर चाहत्यांनी मोठी गर्दी केली. सुरक्षतेच्या कारणास्तव आरसीबीची विजयी मिरवणूक रद्द करण्यात आली आणि त्यांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम चिन्नास्वामी स्डेडियमध्ये आयोजित करण्यात आला. विधानसभेतून बाहेर पडल्यानंतर आरसीबी संघ बसने चिन्नास्वामी स्टेडियमवर पोहोचला. मात्र, तिथेही चाहत्यांनी प्रचंड गर्दी केल्याने चेंगराचेंगरी झाली.

टॅग्स :Bengaluru Stampedeबंगळुरुमध्ये चेंगराचेंगरीRoyal Challengers Bangaloreरॉयल चॅलेंजर्स बेंगलोरIPL 2025इंडियन प्रिमियर लीग २०२५Stampedeचेंगराचेंगरी