शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

लवकरच येणार 50 रूपयांची नोट, फोटो झाले व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2017 20:12 IST

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात 50 रूपयांची नवी नोट चलनात येणार असल्याची घोषणा केली होती.

मुंबई, दि. 18 - रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात 50 रूपयांची नवी नोट चलनात येणार असल्याची घोषणा केली होती. आता लवकरच  50 रूपयांची नोट चलनात येणार आहे. आरबीआयने याबाबत माहिती दिली आहे.  पुढील महिन्यात दस-याला या नोटा चलनात येण्याची शक्यता आहे. नव्या नोटा आल्यावर 50 रूपयांच्या जुन्या नोटा बंद होणार नाहीयेत. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियामध्ये 50 रूपयांच्या नव्या नोटचे फोटो व्हायरल झाले आहेत.  मोदी सरकारने 8 नोव्हेंबर 2016 रोजी रात्री 8 वाजता नोटबंदी जाहीर केली. 1000 आणि 500 च्या नोटा चलनातून बाद झाल्या. त्यानंतर नव्याने 2000 आणि 500 च्या नोटा चलनात आल्या आहेत. आता आणखी एक नोट चलनात येणार आहे तीही नव्या स्वरुपात.500 रूपयांच्या नोटांचा रंग हा साधारण राखाडी रंगाशी मिळताजुळता आहे, तर 2 हजार रूपयांच्या नोटांना जांभळा रंग देण्यात आला आहे. आता 50 रूपयांची नवी नोट चलनात येणार आहे. सोशल मीडियात व्हायरल होणा-या फोटोनुसार या नोटचा रंग मयुर पंखी (साधरण हिरवा) असणार आहे. या नोटेवरही राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा फोटो आहे. तसंच गव्हर्नर उर्जित पटेल यांची स्वाक्षरी आहे. या नोटेची प्रिटिंग आणइ डिझाइन 500 आणि 2000 रूपयांच्या नोटांप्रमाणेच असणार आहे.  या नोटांच्या मागील बाजूस दक्षिणेकडील प्रसिद्ध हंपी मंदिराचा फोटो असणार आहे. 200 रुपयांची नोट लवकरच चलनात-लवकरच 200 रुपयांची नोट चलनात आणली जाणार आहे. काही दिवसात या नोटेची छपाई सुरु होऊन महिनाभरात ही नोट चलणात येणार असल्याची माहिती नंदुरबार जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक महेश प्रभू यांनी ‘लोकमत’शी बोलतांना सांगितले.नंदुरबार शहरासह तळोदा, शहादा, अक्कलकुवा आणि धडगाव शहर व तालुक्याच्या विविध भागात 10 रूपयांची नाणी स्विकारली जात नसल्याच्या तक्रारी गेल्या चार दिवसात सातत्याने वाढल्या आहेत़ 10 रुपयांच्या नाण्याबाबत कोणतेही आदेश नाही-रिझर्व्ह बँकेने 10 रूपयांच्या नाण्यांना बंदीचे कोणतेही आदेश काढलेले नसताना अचानक सुरू झालेल्या या प्रकारामुळे नागरिक हैराण झाले आहेत़ हे प्रकार थांबवण्याची गरज असताना बँकांकडून ठोस प्रकारच्या कोणत्याही उपाययोजना होत नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आह़े ग्रामीण भागातून येणा:यांना बसमध्ये किंवा इतर ठिकाणी मिळालेले 10 रूपयांचे नाणे खर्च करण्यासाठी किरकोळ व्यावसायिकाकडे गेल्यास ते नाणे घेण्यास थेट नकार कळवत आहेत.बँकांकडून जनजागृती आवश्यक- मोठे व्यावसायिकही हे नाणे स्विकारत नसल्याचे प्रकार शहरी भागात दिसून येत आह़े चलनात असलेले नाणे व्यवहारातून काढून टाकण्याच्या या प्रकारांमुळे नागरिकांची सर्वाधिक परवड होत असल्याने बँकांनी जनजागृती करण्याची गरज असल्याचे मत जिल्ह्यातून व्यक्त होत आह़े दहा रुपयाचे नाणे चलणात कायम- महेश प्रभू 10 रूपयांच्या नाण्यांना चलनातून काढण्याचे कोणतेही आदेश रिझव्र्ह बँकेचे नाहीत़ नंदुरबार जिल्ह्यात सुरू झालेला हा प्रकार खोडसाळपणा आह़े बँकांनी आपपल्या ग्राहकांना आणि व्यापा:यांना याबाबत समज द्यावी, 10 रूपयांचे नाणे हे चलनाचा अविभाज्य भाग असल्याचे नंदुरबार जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक महेश प्रभू यांनी ‘लोकमत’सोबत बोलताना दिली.  200 रुपयांची नोट लवकरच-देशात लवकरच 200 रूपयांच्या नव्या नोटा येणार असल्याची माहिती त्यांनी दिली़ या नोटांची छपाई महिनाभरात पूर्ण झाल्यास त्या येत्या महिन्यात चलनात येतील असेही प्रभू म्हणाले.