शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

रिझर्व्ह बँकेची ५० हजार कोटींची कोविड गंगाजळी योजना सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2021 01:35 IST

या निधीतून बँकांना केवळ कोविडशी संबंधित पायाभूत सोयींची उभारणी, औषधी/उपकरणांचे उत्पादन आणि सेवा यांसाठीच कर्ज देता येईल.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : कोविड साथीच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेने व्यावसायिक बँकांसाठी जाहीर केलेली ५० हजार कोटी रुपयांची गंगाजळी योजना शुक्रवारी तातडीने कार्यान्वित करण्यात आली. याबाबतचे परिपत्रक  रिझर्व्ह बँकेने जारी केले आहे.रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी ५ मे रोजी या सुविधेची घोषणा केली होती. ‘टॅप ऑन टर्म लिक्विडिटी फॅसिलिटी’ असे या योजनेचे नाव आहे. ती मुक्तपणे उपलब्ध असणार आहे.  या योजनेअंतर्गत व्यावसायिक बँकांना खास ५० हजार कोटी रुपयांची गंगाजळी उपलब्ध करून देण्यात आली आहे. योजनेची मुदत ३१ मार्च २०२२ पर्यंत असून बँकांना रेपो दराने हा निधी उपलब्ध होईल. 

या निधीतून बँकांना केवळ कोविडशी संबंधित पायाभूत सोयींची उभारणी, औषधी/उपकरणांचे उत्पादन आणि सेवा यांसाठीच कर्ज देता येईल. कोविड लसीचे उत्पादक, लसीचे आयातदार/पुरवठादार, पॅथॉलॉजी प्रयोगशाळा, डायग्नोस्टिक सेंटर्स, ऑक्सिजन व व्हेंटिलेटर्सचे उत्पादक/ पुरवठादार आणि कोविडशी संबंधित इतर औषधांचे उत्पादक व आयातदार इत्यादींना या कर्जाचा लाभ मिळेल. यासाठी बँका ई-मेलद्वारे निधीची मागणी नोंदवू शकतील. आठवडाभरातील मागणीवर रिझर्व्ह बँक दर सोमवारी निधीचे वितरण करेल. ५० हजार कोटींचा निर्धारित निधी संपल्यानंतर बँकांची मागणी पूर्ण केली जाण्याची शक्यता नाही. 

बँकांना ठेवता येणार अतिरिक्त निधीया योजनेत झटपट कर्जे देणाऱ्या बँकाना प्रोत्साहन लाभ देण्यात येणार आहे. बँका थेट लाभधारकास कर्ज देऊ शकतील तसेच मध्यस्थ वित्तीय संस्थामार्फतही कर्ज देऊ शकतील. या योजनेद्वारे मिळणाऱ्या निधीतून बँकांनी स्वतंत्र ‘कोविड कर्ज खाते’ (कोविड लोन बुक) तयार करावे, अशी अपेक्षा आहे. ही योजना चालविणाऱ्या बँकांना आपल्या ‘कोविड कर्ज खात्या’एवढा अतिरिक्त निधी रिझर्व्ह बँकेकडे ‘रिव्हर्स रेपो विंडो’च्या माध्यमातून ठेवता येईल. त्यावर रिझर्व्ह बँक त्यांना जे व्याज देईल, ते रेपोदरापेक्षा ०.२५ टक्क्यांनी कमी असेल.

टॅग्स :Reserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँकcorona virusकोरोना वायरस बातम्या