शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
2
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
3
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
4
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
5
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
6
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?
7
दहशतवाद्यांना पोसल्याचा पाकला त्रास; माझ्या आईला त्यांनीच गोळ्या घातल्या
8
पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या यु ट्यूब चॅनलवर भारतात बंदी, मंत्र्याचे X अकाऊंटही ब्लॉक
9
Home Loan: १५ लाखही वाचतील आणि ६० महिने आधीच होम लोनचं टेन्शन संपेल, कसं? जाणून घ्या
10
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
11
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
12
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
13
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
14
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
15
विझिनजम बंदरामुळे आर्थिक प्रगती; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले उद्घाटन
16
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
17
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
18
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
19
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
20
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका

बुरोंडी जेटीचा प्रश्न मार्गी लावणार : रवींद्र चव्हाण

By admin | Updated: July 13, 2017 16:36 IST

किनारपट्टी परिसराची केली प्रत्यक्ष पाहणी

आॅनलाईन लोकमतदापोली (जि. रत्नागिरी), दि. १३ : जिल्ह्यातील पारंपरिक मच्छीमारी बंदर अशी ओळख असणाऱ्या बंदरात मच्छीमारी जेटीची उभारणी करावी, अशी मागणी गेली ४० वर्षे मच्छिमार बांधव करीत आहेत. परंतु आजपर्यंत केवळ आश्वासनापलिकडे काहीही मिळाले नाही. मात्र, राज्याचे बंदर विकास राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी बुधवारी बंदराची पाहणी करून जेटीचा विषय मार्गी लावण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे लवकरच जेटी होईल, या आशेवर मच्छीमार आहेत.

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बॅकवॉटर तयार करून जेटीचा विषय मार्गी लावू. त्याशिवाय जेटी उभारता येणे अशक्य आहे. मात्र, ती उभारण्यासाठी काय करावे लागेल? याबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी अधिकाऱ्यांसोबत आणखी एक बैठक होईल, असे यावेळी चव्हाण म्हणाले.

यावेळी चव्हाण म्हणाले की, आपण या बुरोंडी किनारपट्टी परिसराची प्रत्यक्ष पाहणी केली आहे. अधिकाऱ्यांच्या बोलावलेल्या बैठकीमध्ये सखोल चौकशी करून त्यावर अभ्यासपूर्ण निर्णय घेण्यात येईल, असे ते म्हणाले. आपण यात स्वत: लक्ष घालून स्थानिक ग्रामस्थांना विश्वासात घेऊन या बुरोंडी बंदर जेटीचे काम लवकारात लवकर मार्गी लावू, असे ठोस आश्वासन दिले. यावेळी त्यांच्यासमवेत स्मिता जावकर, उदय जावकर, अजय साळवी, मुश्ताक दरवेश, बावा केळसकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. रवींद्र चव्हाण यांची बुरोंडी भंडारी समाजाचे अध्यक्ष सुहास हेदुकर, संदीप शेवडे, अशोक बागकर, नवरंग बागकर, श्रीराम बागकर यांनी भेट घेतली.