शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

रवि जाधव यांचा 'न्यूड' सिनेमा इफ्फीतून वगळला, सिनेमाच्या नावावर केंद्र सरकारला आक्षेप

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2017 16:03 IST

रवि जाधव दिग्दर्शित 'न्यूड' या सिनेमाला 48 व्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमधून (इफ्फी) वगळण्यात आलं आहेे.

ठळक मुद्दे रवि जाधव दिग्दर्शित 'न्यूड' या सिनेमाला 48 व्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमधून (इफ्फी) वगळण्यात आलं आहेे. तेरा ज्युरी मेबर्सनी एकुण 24 सिनेमांची पॅनोरामा विभागासाठी निवड केली होती. पॅनारोम विभागात न्यूड सिनेमाचं स्क्रीनिंग होणार होतं.

मुंबई- रवि जाधव दिग्दर्शित 'न्यूड' या सिनेमाला 48 व्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमधून (इफ्फी) वगळण्यात आलं आहे. तेरा ज्युरी मेबर्सनी एकुण 24 सिनेमांची इंडियन पॅनोरमा विभागासाठी निवड केली होती. पॅनारोम विभागात न्यूड सिनेमाचं स्क्रीनिंग होणार होतं. पण माहिती व प्रसारण मंत्रालयाने जारी केलेल्या यादीतून या सिनेमाला वगळण्यात आलं आहे. सिनेमाच्या नावावर आक्षेप घेत या सिनेमाला यादीतून वगळल्याची माहिती मिळते आहे.

ज्युरी मेंबर्सचा सल्ला न घेता हा मोठा बदल करण्यात आला आहे. ज्युरीपैकी एक असणाऱ्या अपूर्वा असराणी यांनी केंद्राच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. कालपर्यंत मला सिनेमा यादीतून वगळल्याची माहिती नव्हती. फेडरेशनकडे मी यासंदर्भात लेखी नाराजी व्यक्त केली आहे, असं अपूर्वा असणारी यांनी म्हंटलं आहे. या सिनेमातून महिलेला अत्यंत सन्मानाची आणि आदराची वागणूक दिली गेली आहे. त्यामुळे मंत्रालय त्यांच्या निर्णयावर फेरविचार करून ज्युरीचा निर्णय कायम ठेवेल, अशी आशा असल्याचं अपूर्वा असराणी यांनी म्हंटलं आहे. इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

दिग्दर्शक रवि जाधव यांचा 'न्यूड' हा सिनेमा न्यूड मॉडेल म्हणून काम करणाऱ्या एका तरूण स्त्रीच्या जीवनावर आधारीत आहे. सिनेमाची इफ्फीतील स्क्रीनिंगसाठी निवड झाल्याचं वाटलं होतं. पण सकाळी वृत्तपत्रात बातमी बघितल्यावर सिनेमाला वगळल्याचं समजलं. केंद्राच्या या निर्णयामुळे माझी निराशा झाली आहे. ज्युरी जो निर्णय घेतो तो अंतिम असतो, असं माझं व्यक्तिगत मत आहे. पण ज्युरी मेंबरला कल्पना न देता सिनेमाचं नाव वगळणं, कुणालाही रूचणार नाही. निर्णय घेताना ज्युरीला कल्पना द्यायला हवी होती, असं रवी जाधव यांनी म्हंटलं. सिनेमामध्ये काहीही आक्षेपार्ह नाही. पुढील आठवड्यात हा सिनेमा सेन्सॉर बोर्डाकडे जाणार असल्याचं दिग्दर्शक रवि जाधव यांनी म्हंटलं आहे. 

न्यूड सिनेमाव्यतिरिक्त मल्ल्याळम सिनेमा 'एस.दुर्गा'ला सुद्धा इफ्फीतून वगळण्यात आलं आहे. या सिनेमातून समाजामधील गडद वास्तव आकर्षकपणे मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन सनलकुमार ससिधरन यांनी केलं आहे. माहिती व प्रसारण मंत्रालयाने जारी केलेल्या यादीत या सिनेमाचं नाव नसल्याचं समोर आलं आहे.