शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

पंजाबमध्ये मोफत रेशनच्या नावाखाली लुटालूट, २४ हजार मृतांनाही मिळतं धान्य, बोगस रेशन कार्डचाही सुळसुळाट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2023 16:15 IST

Ration Scheme In Punjab: पंजाबमध्ये मोफत रेशनच्या नावावर लुटालूट होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. राज्यामध्ये तब्बल २४ हजारांहून अधिक मृत व्यक्तींच्या नावाने रेशन जारी होत असल्याची बाब समोर आली आहे.

पंजाबमध्ये मोफत रेशनच्या नावावर लुटालूट होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. राज्यामध्ये तब्बल २४ हजारांहून अधिक मृत व्यक्तींच्या नावाने रेशन जारी होत असल्याची बाब समोर आली आहे. त्याशिवाय काही प्रतिष्ठित लोकांनीही मोफत रेशन मिळवण्यासाठी अफरातफर करून बनावट रेशन कार्ड बनवल्याचे उघडकीस आले. आता तपासानंतर हे रेशनकार्ड रद्द करण्यात आले आहेत. ही बनावट रेशनकार्ड बनवणाऱ्या लोकांची शहरांमध्ये घरं होती. तसेच त्यांचं वार्षिक उत्पन्नही निर्धारित उत्पन्नापेक्षा अधिक होतं. सरकारने सर्व जिल्हा अन्न आणि पुरवठा नियंत्रणांना तपासाचे आदेश दिले होते. त्यातूनच या अफरातफरीचा उलगडा झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार विभाहाने आतापर्यंत ४० लाख ६८ हजार ८८७ रेशन कार्डची तपासणी केली आहे. त्यातील ३ लाख ३७ हजार ५६७ रेशनकार्ड अवैध असल्याचे समोर आले आहे. तर १ लाख ७९ हजार ८३७ रेशन कार्ड रद्द करण्यात आले आहेत. कोरोनाकाळात सरकारने मोफत धान्य देण्याची घोषणा केली होती. त्यानंतर जे मोफत रेशनकार्डसाठी पात्र नव्हते त्यांनीही रेशनकार्ड  मिळवण्यासाठी जुगाड लावून स्वत:ला या योजनेसाठी पात्र करून घेतले. दरम्यान, तपासानंतर आता विभागाने २४ हजार मृतांची नावंही यादीमधून हटवली आहेत.

विभागीय माहितीनुसार रेशन कार्डचा तपास अद्याप सुरू आहे. तसेच सरकारने सुमारे ९६ टक्के रेशनकार्डची तपासणी केली आहे. उर्वरित सुमारे ४ टक्के रेशन कार्ड तपासली जात आहेत. तपासामध्ये काही लोकांची शहरामध्ये २०० पासून एक हजार चौरस फुटांपर्यंत घरं बांधलेली आहेत, ते मोफत रेशन घेत होते. अशा लोकांची नावं आता यादीतून हटवण्यात आली आहेत.

टॅग्स :Punjabपंजाब