शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

अधिकाऱ्यांनी कामात तत्परता न दाखवल्यास बरखास्त करणार : राठोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2018 04:19 IST

क्रीडामंत्री राज्यवर्धनसिंह राठोड यांनी अधिका-यांनी जर खेळाडूंना प्रोत्साहन रक्कम देण्यास उशीर लावला तर त्यांना बरखास्त केले जाईल, असा इशारा दिला आहे.

नवी दिल्ली : क्रीडामंत्री राज्यवर्धनसिंह राठोड यांनी अधिका-यांनी जर खेळाडूंना प्रोत्साहन रक्कम देण्यास उशीर लावला तर त्यांना बरखास्त केले जाईल, असा इशारा दिला आहे.येथे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पदकविजेत्यांच्या सन्मान सोहळ्यात राठोड म्हणाले, ‘‘भारतीय खेळांसाठी पैशांची कोणतीही कमतरता नाही; परंतु खेळाडू आणि महासंघाने त्याचा उपयोग योग्य उद्देशासाठी करायला हवा. क्रीडा मंत्रालय व भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या अधिकाºयांकडे आवश्यकता आणि समस्या लवकरात लवकर सोडवण्याची जबाबदारी सोपवली आहे. खेळाडूंना योग्य वेळी प्रोत्साहन रक्कम अथवा निधी मिळण्यास अडचण होत असेल, तर काही अधिकाºयांना बरखास्त केले जाऊ शकते; परंतु खेळाडूंनी आरोप लावण्याआधी चुकाही आमच्याकडून आहे, की त्यांच्याकडून, हे निश्चित करावे. एका अधिकाºयाला आपण निलंबित करणारच होतो, तेव्हा त्यानंतर खेळाडूला एका वर्षाआधीच रक्कम दिली गेली असल्याचे कळले होते.’’भारताने गोल्ड कोस्ट येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत २६ सुवर्ण, २० रौप्य आणि २० कांस्यपदकांसह एकूण ६६ पदकांची कमाई केली. राठोड यांनी भारतीय आॅलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष नरिंदर बत्रा यांच्या उपस्थितीत पदकविजेत्यांना प्रोत्साहन रक्कम दिली. एमसी मेरी कोम, सुशील कुमार, सायना नेहवाल, पी. व्ही. सिंधू, मीराबाई चानू, नीरज चोपडा, मनू भाकर, अनिष भानवाला आणि जीतू राय, तेजस्विनी सावंत, राहुल आवारेसह अनेक आघाडीचे खेळाडू या वेळी उपस्थित होते. वैयक्तिक सुवर्णपदकविजेत्यांना प्रत्येकी ३० लाख रुपये, तर रौप्य आणि कांस्यपदकविजेत्यांना अनुक्रमे २० व १० लाख रुपये देण्यात आले. सांघिक स्पर्धेतील विविध खेळांच्या खेळाडूंना वेगवेगळी रक्कम देण्यात आली.रोख पारितोषिक वितरणानंतर सर्व खेळाडूंनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद व सविता कोविंद यांची भेट घेतली. या वेळी या दोघांनी खेळाडूंचे कौतुक केले. तत्पूर्वी, सर्व खेळाडूंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीसुद्धा भेट घेतली. या वेळी मोदी यांनी खेळाडूंचे कौतुक तर केलेच, पण आगामी स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या. प्रत्येक खेळाच्या खेळाडूंबरोबर मोदींनी छायाचित्र काढले.