शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडकी बहीण’मुळे निधी उशिरा, कामे होणार कशी? गुलाबी रंगात निवडून आलेल्या अजित पवार गटाच्या मंत्र्यांचाच तक्रारीचा सूर
2
‘एमपीएससी’ची तयारी करणाऱ्या एकुलत्या एक मुलाचा अपघाती मृत्यू; पुण्याच्या दिशेने जात होता...
3
६ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या स्नेहाचा मृतदेह सापडला; आई-वडिलांचा टाहो, मैत्रिणीचा मोठा दावा
4
गृहप्रवेशानंतर नववधू चक्कर येऊन पडली, पतीने थेट प्रेग्नन्सी टेस्ट किटच आणली! चिडलेल्या नवरीने काय केलं वाचाच... 
5
Pravin Gaikwad : 'माझ्या हत्येचा कट होता, याला पूर्णपणे सरकार जबाबदार'; प्रवीण गायकवाडांचा आरोप
6
स्मशानभूमीचे उद्घाटन न झाल्याने अंत्यविधीस परवानगी नाकारली; भरपावसात डिझेल ओतून पेटवली चिता
7
Anthem Biosciences IPO आजपासून गुंतवणुकीसाठी खुला; कधीपर्यंत आणि किती करावी लागेल गुंतवणूक, GMP किती?
8
मनसेचे २ दिवसीय शिबिर, ठाकरे बंधू युतीवर भूमिका ठरणार; राज ठाकरे काय देणार 'कानमंत्र'?
9
'ते गप्पा चांगल्या मारतात, पण रात्रीच्या अंधारात लोकांवर बॉम्ब टाकतात', ट्रम्प पुतीन यांच्यावर भडकले
10
अरे देवा! आई वारंवार भेंडीची भाजी बनवायची म्हणून लेक चिडला, १२०० किमी दूर पळून गेला अन्...
11
नोकरीसाठी डिग्री आणि सीव्हीची गरज नाही! थेट १ कोटी रुपयांचं पॅकेज, फक्त 'या' २ अटी पूर्ण करा
12
ऑपरेशन 'सिंदूर'नंतर 'ब्रह्मोस मिसाइल'ची मागणी वाढली, १४-१५ देश रांगा लावून उभे!
13
रशियाकडून क्रुड ऑईलची विक्रमी आयात; पेट्रोलियम मंत्री म्हणाले, "भारताचं ऊर्जा धोरण कोणत्याही दबावाखाली..."
14
"कलाकाराला ऐकून घ्यावंच लागतं, पण..." शरद उपाध्येंच्या आरोपांवर निलेश साबळेचं पुन्हा प्रत्युत्तर
15
ठाणे स्टेशनजवळ भीषण आग! स्कायवॉकजवळच्या आगीमुळे प्रवाशांमध्ये उडाला गोंधळ
16
साप्ताहिक राशीभविष्य: २ राजयोगांचा ९ राशींना दुपटीने लाभ, सुबत्ता-भरभराट; गुंतवणुकीत नफा!
17
गुडबाय ISS! पृथ्वीवर परतण्यापूर्वी शुभांशू शुक्ला यांचे फोटो आले समोर, आजपासून परतीचा प्रवास सुरू होणार
18
मुख्याध्यापक वर्गातच झिंगून वर्गातच झोपले; खिशात देशी दारूची आणखी एक बाटली भरलेली... 
19
आयुष्याचा शेवट ठरला Live स्टंट...फिल्म शुटींगवेळी स्टंटमॅनचा जागीच मृत्यू; धक्कादायक व्हिडिओ समोर
20
पतीला घटस्फोट देणाऱ्या सायना नेहवालकडे किती संपत्ती आहे? आकडा ऐकून थक्क व्हाल!

रेल्वेच्या ‘कायाकल्पा’ची धुरा रतन टाटांच्या हाती!

By admin | Updated: March 19, 2015 23:26 IST

रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी ‘कायाकल्प परिषद’ स्थापन करण्याची व तिची धुरा ख्यातनाम उद्योगपती रतन टाटा यांच्या हाती सोपविण्याची घोषणा केली.

नवी दिल्ली : येत्या काही वर्षांत भारतीय रेल्वेचा ‘कायाकल्प’ घडवून आणण्याचा रेल्वे अंदाजपत्रकात जाहीर केलेला संकल्प तडीस नेण्याच्या दिशेने पुढचे पाऊल टाकत रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी ‘कायाकल्प परिषद’ स्थापन करण्याची व तिची धुरा ख्यातनाम उद्योगपती रतन टाटा यांच्या हाती सोपविण्याची घोषणा केली.रेल्वे यंत्रणा सुधारणे, ती कार्यक्षम करणे व तिच्या कारभात आमूलाग्र परिवर्तन घडवून आणण्यासाठी कोणत्या नव्या कल्पना,योजना व पद्धती राबवाव्या लागतील हे सुचविण्याचे काम ही ‘कायाकल्प परिषद’ करेल. टाटा उद्योग समुहाचे मानसेवी अध्यक्ष रतन टाटा हे या परिषदेचे प्रमुख असतील. शिवाय आॅल इंडिया रेल्वेमेन्स फेडरेशन व नॅशनल फेडरेशन आॅफ इंडियन रेल्वेमेन या रेल्वे कर्मचाऱ्यांच्या दोन सर्वात मोठ्या मान्यताप्राप्त संघटनांचे सरचिटणीस अनुक्रमे शिव गोपाल मिश्रा आणि एम. राघवय्या यांनाही या परिषदेवर सदस्य म्हणून नेमण्यात आल्याचे प्रभू यांनी सांगितले. या दोघांच्या रूपाने रेल्वेचे सर्वच कर्मचारीही एक प्रकारे रेल्वेच्या कायाकल्पाचे शिवधनुष्य पेलण्याच्या प्रयत्नांना हातभार लावतील. नव्या कल्पना समोर आल्याखेरीज कायाकल्प शक्य होणार नाही. परिषदेवर लवकरच आणखीही सदस्य नेमले जातील, असे रेल्वेमंत्री म्हणाले.४असे म्हणतात की, स्वातंत्र्यपूर्व काळातील खासगी व संस्थानी रेल्वेंचे राष्ट्रीयीकरण केले गेले तेव्हा रेल्वे ताब्यात घेण्याची व ती कार्यक्षमतेने चालविण्याची तयारी टाटा उद्योग समूहाने दर्शविली होती. पण तसे घडले नाही आणि त्यानंतरच्या सुमारे सात दशकांत मरणासन्न अवस्थेप्रत आलेल्या रेल्वेत नवसंजीवनी कशी फुंकावी हे सुचविण्यासाठी सरकारला पुन्हा टाटांकडे वळावे लागले आहे.