राष्ट्रीय मुलनिवासी कर्मचारी संघाचे धरणे आंदोलन
By admin | Updated: March 15, 2016 00:33 IST
जळगाव : राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघातर्फे आपल्या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. याबाबत निवासी उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके यांना निवेदन देण्यात आले.
राष्ट्रीय मुलनिवासी कर्मचारी संघाचे धरणे आंदोलन
जळगाव : राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघातर्फे आपल्या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. याबाबत निवासी उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके यांना निवेदन देण्यात आले.विनेदनात,२० पेक्षा कमी पटसंख्या असणार्या शाळा बंद करण्याचा निर्णय शासनातर्फे घेण्यात आला आहे. तो ग्रामीण व अतिग्रामीण भागातील मूल निवासी बहुजन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करणारा आहे. हा निर्णय मागे घ्यावा, २००५ नंतर नियुक्त कर्मचार्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणे. सरकारी कर्मचारी भरती बंदीचा निणय मागे घेणे. युवकांना रोजगार द्यावा या मागण्यांसाठी कर्मचारी संघातर्फे धरणे आंदोलन करण्यात आले.आंदोलनात मुख्तार शेख,महेंद्र सावकारे, हरीष पाने, हेमंत पाटील, किशन सूर्यवंशी, देविदास तायडे, नितीन चौधरी, संजीव बेनाडे, रामदास हंसरे, रहिस जनाब, रमेश थाटे, नीलेश चौधरी यांचा सहभाग होता.